*अपघातात एकाचा मु्त्यू* *परिवाराचा घातपातीचा आरोप उच्चस्तरीय कारवाईची मागणी*

*अपघातात एकाचा मु्त्यू*

*परिवाराचा घातपातीचा आरोप उच्चस्तरीय कारवाईची मागणी*

मुख्य संपादक -किशोर ढूँढेले

सावनेरः सावनेर पोलीस स्टेशनमधील हेटी बायपास रिठी पारडी शिवारात आज सकाळी मु्तक लक्ष्मण श्रावण कडू रा.वार्ड क्र.10 काकडे लेआऊट सावनेर यांच्या रस्ते अपधात झाल्याची माहीती उघडकीस आली*

*प्राप्त माहितीनुसार मु्तक लक्ष्मण कडू हा सावनेर वेकोली येथे कामगार असुन दि.19 ला शुक्रवारला सायंकाळी 4-00 वाजता अपल्या कर्तव्यावरूण घरी परतला व आंघोळ करुण घराबाहेर पडून सुमारे 6-00च्या दरम्यान आपले हीरो स्पेल्डर MH 40 BU 5095 या दुचाकीवरून त्याच्या रीठी पारडी शीवारातील शेतीत जाण्यासाठी घराबाहेर पडला रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नही तो कधीकधी घरी परतत नसल्यामुळे घरच्यांनी याकडे विशेष लक्ष दीले नाही.*
*आज दी.20 नोव्हेंबर ला सकाळी 7-00चे दरम्यान त्यांच्या अज्ञात वहानाने अपधाताची बातमी कळताच एपीआय शिवाजी नागवे,हवालदार अतुल खोडनकर व सहकारी मंडळींने घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा करूण समाजसेवी हितेश बंन्सोड यांना बोलावून त्यांच्या मु्तकाचे शव शवविच्छेदनाकरीता प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे रवाना करूण अज्ञात वाहन व वाहन चालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करुण पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला आहे*

*माझ्या वडीलाचा अपघात नसुन घातपात*

*मु्तकाचा मुलगा फीर्यादी अनिकेत लक्ष्मण कडू यांनी घटनास्थळावरील संशयीत परिस्थिती तसेच त्यांच्या वडीलांच्या डोक्यावर असलेल्या जखमा,वाहनाच्या हेडलाईट कव्हर वर लागलेले रक्त तसेच वाहनाचे फक्त पेट्रोल टंकीला थोडेसे चेपकले व सामोरील दोन्ही एँन्डीकेटर तुटल्या ऐवजी वाहनास अपधातदु्ष्य काही विशेष दिसत नसल्याने व घटना स्थळावर मु्तकाच्या चपला ऐवजी अजुन दोन चपला अजुन असल्याने हा अपधाताचा नव्हे तर घातपाताचा विषय असल्याचा संशय व्यक्त केला आहे*

घटनेचा सखोल तपास करुण सत्यता उघडकीस आणन्याकरिता प्रथामीकता – ठाणेदार मारुती मुळूक

*सदर घटना ही प्रथमदु्ष्टिने अपघाती असल्याचे दिसून येत आहे तरीपण मु्तकाच्या परिवाराने व्यक्त केलेल्या संशयास्पद गोष्टींची दखल घेऊण त्यादिशेने तपास करण्यात येत असुन मी स्वतः घटनास्थळी भेट देऊण इतर बाबींचे सुक्ष्म निरीक्षण करुण अन्य पुरावे गोळा करुण मु्तकाचे शवाचे योग्यरीत्या शवविच्छेदन व्हावे याकरीता परिवाराच्या मागणीनुसार शासकीय रुग्णालय नागपुर येथे शवविच्छेदना करीता पाठवून पुढील चौकशी सुरू आहे व चौकशीअंती घटनेची सत्यता उघडकीस येईल असा विश्वास ठाणेदार मारुती मुळूक यांनी व्यक्त केला आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …