*आपले सरकार प्रकल्पातील संगणक परीचालकांचे थकीत मानधन अदा करण्याची मागणी*
*गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन*
खापरखेडा : सावनेर पंचायत समिती अंतर्गत ७६ ग्रामपंचायती मध्ये कार्यरत ५९ संगणक परीचालकांचे मागील दोन महिन्यान पासून थकीत मानधन अदा करण्यात आले नाही.ज्यामुळे सावनेर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने नुकतेच सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक गरुड यांना निवेदन देऊन ७ दिवसाच्या आत थकीत मानधन अदा करण्याचे मागणी करण्यात आली. सात दिवसात केंद्र चालकांचे थकीत मानधन अदा न झाल्यास १ डीसेंबर पासून पंचायत समिती कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरु करून संपूर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. असे लेखी निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनाला संगणक परिचालक संघटनेने कळविले आहे.
ग्रामविकास विभाग अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून सीएससी एसपीव्ही या खाजगी कंपनीला प्रकल्पाच्या अमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान मनुष्यबळ, साधन सामुग्री, आणि देखभाल दुरुस्ती व प्रशिक्षणाची जबाबदारी देऊन तसा करार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग कडून करण्यात आलेला आहे. त्या
नुसार सावनेर पंचायती अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायती कडून १५ वित्त आयोगातून एका वर्षा करिती कंपनीला निधी देण्यात आलेले आहे. याच निधीतून संगणक परीचालकाना दर महिन्याला मानधन देण्याच करार सुद्धा करण्यात आलेला आहे. मात्र कंपनी प्रशासन या कराराचे उलंघन करून संगणक परीचालकानचे मानधन रोखून का ठेवतात? हे समजण्यापलीकडे आहे. या सीएससी एसपीव्ही कंपनीवर कारवाई करून संगणक परीचालकांचे दोन महिन्याचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे अशी मागणी संघटनेच्य शिष्टमंडळानी निवेदनातून केली.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष आशिष गोडबोले, उपाध्यक्ष प्रदीप काटे, सचिव आशिष कुकडे, दर्शना नरड , सुनील नेवारे, सुलोचना बागडे, हेमंत दंडारे, निलेश कुंभारे, राहुल पालेकर, आशिष क्षिरसागर,रिता सुर्यवंशी सह अनेक संगणक परीचालक उपस्थित होते.