*डुमरी येथे अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक तहसील च्या ग्रस्त पथकाने पकडला*
*पुढील कारवाई पर्यंत ट्रक कन्हान पोलीस स्टेशन च्या ताब्यात*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तहसील कार्यालय महसुल विभागाचे रात्री कालीन ग्रस्त पथकात मंडळ आधिकारी जगदिश मेश्राम, घुळे, महेंन्द श्रीरसागर हे पेट्रोलिंग करीत असतांना डुमरी येथे पहाटे सकाळी एक ट्रक आढळुन आल्याने पथकाने ट्रक ला थांबवुन पाहणी करित ट्रक चालकाला विचारपुस केली. तर ट्रक चालकांने तीन ब्रॉस ची राॅयल्टी दाखविली. ट्रक मध्ये सहा ब्रॉस च्या वर रेती अवैध आढळुन आल्याने तहसील कार्यालय पारशिवनी चे रात्री कालीन ग्रस्त पथकाने ट्रकला पुढील आदेश होई पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला ठेवले आहे.
महसुल विभाग सुत्राकडुन मिळालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २१ नोव्हेंबर ला तहसील कार्यालय पारशिवनीचे रात्री कालीन ग्रस्त पथकात मंडळ आधिकारी श्री जगदिश मेश्राम, श्री घुळे, श्री महेंन्द श्रीरसागर हे सोमवार दिनांक.२२ नोव्हेंबर २०२१ च्या पहाटे ३:४० वाजता च्या दरम्यान ग्रस्त पथकाने डुमरी येथे पेट्रोलिंग करीत असतांना एक ट्रक क्रमांक. ४९ एटी ५१४८ हा मिळुन आल्याने पथक प्रमुख मंडळ अधिकारी जगदिश मेश्राम यांनी ट्रक ला थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये रेती आढळुन आल्याने ट्रक चालक सुरेंन्द्र परसराम गराडे वय ३५ वर्ष राहणार. सिहोरा कन्हान यास परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी अनु क्रमांक. एस ५१७०, एस ५१७१, एस ५१७२ प्रत्येकी एक ब्रॉस एकुण तीन ब्रॉस ची राॅयल्टी दाखविली. सदर वाहनात (टी पी क्रमांक. ११३५९५५, ११३५९५५ , ११३५९५५) मध्ये एकुण सहा ब्रॉसच्या वर रेती असुन सदर राॅयल्टी दिनांक.२१ नोव्हेंबर ला सकाळी ११:०८ वाजता पर्यत ची दिली असुन सदर ट्रक वाहन दिनांक.२२ नोव्हेंबर ला पहाटे ३:४० वाजता पकडण्यात आले. सदर प्रकरण पारशिवनी तहसीलदार मा.प्रशांत सांगडे यांचे कोर्टात सुरू करण्यात येत असुन सदर प्रकरणाचा आदेश होई पर्यंत सदर वाहन तहसील कार्यालय पारशिवनीचे रात्री कालीन ग्रस्त पथकाने कन्हान पोलीस स्टेशन च्या ताब्यात ठेवले आहे. सदर कारवाई तहासीलदार प्रशांत सांगळे यांचे मार्गदर्शनात रात्रकालीन ग्रस्त पथकाचे मंडळ आधिकारी श्री जगदिश मेश्राम, श्री महेंन्द क्षीरसागर, श्री धुळे साहेब पारशिवनी यांचे पथक पुढील तपास करित आहे.