*शेत जमीन वादावरून चार आरोपींनी महिलेच्या मानेवर ईऱ्या सारख्या शस्त्राने मारून केले जख्मी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस १५ किलोमीटर अंतरावरील हनुमान नगर खेडी येथे चार आरोपींतानी शेत जमीन जागेच्या वादावरून महिलेच्या मानेवर ईऱ्या सारख्या शस्त्राने व हाथबुक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने कन्हान पोलीसांनी महिलेच्या तक्रारीने चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहीतीवरून धनलक्ष्मी रामकृष्ण कारंकी वय ३२ वर्ष राहणार. हनुमान नगर खेडी व आरोपी हे एकाच गावात राहत असुन यांची शेती ऐकमेकांच्या आजु बाजुला लागुन असुन नेहमी जागेचे भांडण होत असुन सोमवार दिनांक.२२ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ७ वाजता दरम्यान फिर्यादी धनलक्ष्मी कारंकी ही आपले घरी असतांना घरासमोर आरोपी १) चंदनराव मारशेट्टी व त्याचा मुलगा आरोपी २) कोलंमा मारशेट्टी, ३) महेश मारशेट्टी, ४) शिवराम कृष्णन चौघेही राहणार. हनुमान नगर खेडी हे आले व म्हटले की, ” तुम हमारे जमीन पर खेती कर रहे हैं असे म्हणुन हमारी जमीन छोड दो नही तो तल वार से काट डालुंगा और सबको आंधप्रदेश भेज दुंगा ” असे म्हणुन शिविगाळ करून महिलेला हाथबुक्याने व ईऱ्या सारख्या शस्त्राने मानेवर मारहाण करून गंभीर दुखापत करित जीवे मारण्याची धमकी दिली. अश्या फिर्यादी महिला धनलक्ष्मी कारंकी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी एन.सी व अप क्र. ५७३/२०२१ कलम ३२३, ५०४, ५०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे, खुशाल रामटेके हे पुढील तपास करीत आहे.