*कन्हान – पिपरी धरमनगर येथे हरिणाच्या पाळसाला कुत्र्यानी मारले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत धरमनगर पिपरी येथे एक हरिणाच्या पाळसाला (पिल्याला) कुत्र्यांनी मारल्याने नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवुन त्यांना पुढील कारवाई करिता पाळसा ला स्वाधिन केले.
कन्हान नदी काठालगत पिपरी धरमनगर परिसर असल्याने नदीचे पाणी पिण्याकरिता हरिणाचे कळप नेहमी येत असतात. अश्याच हरिणाच्या कळपातील छोटे हरिणाचे पाळस वाट चुकुन धरमनगर परिसरात आल्याने तेथील कुत्र्यांनी त्या पाळसाचे लचके तोडुन मारले. गुरुवार दिनांक.२५ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ६ वाजता दरम्यान पहाटे फिरायला जाणाऱ्यांना हरिणा चे छोटे पाळस दिसल्याने नागरिकांनी नगरपरिषद
कन्हान-पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयाना माहीती दिली असता त्यांनी वनविभाग च्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलाविले. वनविभागाचे प्राणी संरक्षण पथक पोहचले आणि पथकाने त्या मृत हरिणाच्या पाळसा ला ताब्यात घेत पुढील कारवाई करिता सोबत घेऊन गेेले.