*टेकाडी येथे रामसरोवर तलावात एका इसमाने उडी घेऊन केली आत्महत्या*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी येथे असलेल्या रामसरोवर तलावात एका इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी नंदकिशोर रामराव लेकुरवाळे वय ४६ वर्ष राहणार टेकाडी यांचे जावई मृतक नुमराज जंगलुजी घोघरे वय ६३ वर्ष हे शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर ला सकाळी ९:०० वाजता फिरायला जातो म्हणुन घरुन निघुन गेले असता सायंकाळ पर्यंत घरी परत आले नसल्याने तेव्हा परिवारांनी त्यांचा शोध घेतला असता मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला मिसिंग ची तक्रार दिली होती .
सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर ला सकाळी ८:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नंदकिशोर रामराव लेकुरवाळे यांचा भासा नामे आकाश घोघरे वय २८ वर्ष हा आपल्या वडीलांना शोधत असतांना टेकाडी गावाच्या जवळील रामसरोवर तलाव येथे जाऊन पाहणी केली असता त्याला तलावात एक प्रेत उबडे तरंगतांना दिसुन आल्यानंतर त्यांनी फिर्यादी ला फोन लावुन सांगितले असता सर्व नातेवाईकांनी तलावा जवळ जाऊन पाहणी केली आणि कन्हान पोलीसांना माहिती दिली असता कन्हान पोलीस व गोताखोर हे घटनास्थळी पोहोचल्यावर गोताखोऱ्यांनी ते प्रेत बाहेर काढले असता फिर्यादींनी ते प्रेत पाहुन ओळखले आणि म्हणाले कि हेच माझे जावई नुमराज जंगलुजी घोघरे हेच आहेत . फिर्यादी यांच्या जवायांना मागील चार वर्षापासुन लघ्वीमध्ये फार त्रास होत असल्याने जावई फार वैतागुन गेले असुन डाॅक्टरांनी त्यांना आॅपरेशन करण्याबाबत सांगितले होते परंतु फिर्यादी यांचे जावई हे आॅपरेशन करण्यास तयार नसुन मागील ३ महिन्यापासुन त्यांचा लघ्वीचा त्रास खुप जास्त प्रमाणात वाढला असुन ते फिर्यादी व फिर्यादींच्या नातेवाईकांना म्हणायचे कि या त्रासामुळे मला आत्महत्या करावसे वाटते . फिर्यादी यांचे जवाई हे लघ्वीच्या त्रासाला कंटाळुन रामसरोवर तलाव टेकाडी येथे जाऊन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे . त्यांचे आत्महत्या करुन मरणाबाबत फिर्यादी व फिर्यादींच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे संशय नाही . अश्या फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी पोस्टे ला मर्ग क्रमांक ४६/२०२१ कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .