तरुण युवकाने गळफास लावुन केली आत्महत्या
सावनेर : सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत माळेगाव येथे जितेंद्र नथ्थुजी गोमकरी (२५ )रा .तेलकामठी त. कळमेश्वर असुन युवकाने माळेगाव शिवारात गुलमोहरच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली.
संबंधीत नातेवाईकांना फोन द्वारे माहीती देऊन पोलिस अधिकारी घटना स्थळी पोहचुन मृतक तरुणाला सावनेर प्राथमिक केंद्र येथे आणुन पोस्टमार्डम (शवविच्छेद) करिता पाठविले . तरुण हा तेलकामठी त. कळमेश्वर येथे राहत असुन माळेगाव येथिल एका सोयाबीन कंपनीत काम करित होता.
पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोहव संदीप नागरे पुढील तपास करित आहेत