*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय ,सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांनी माल्यार्पण करून दीप प्रज्वलित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांवर प्रकाश प्रा.विजय वनकर यांनी टाकला . अध्यक्षीय भाषणामध्ये संचालिका प्राचार्य लता वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्रीसुत्री ला आत्मसात करण्याचे आव्हान केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्री द्वारे आपण अनेक आव्हानांना तोंड देऊ शकतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्या लता वाघ ,संस्थेचे स्थायी सदस्य प्रा.वसंत हिवरकर रामकृष्ण कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला