*सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्या जयंती पीत्यर्थ भव्य रोग निदान शीबीर संपन्न*

*सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्या जयंती पीत्यर्थ भव्य रोग निदान शीबीर संपन्न*

*नागरिकांचा उत्सफुर्त सहभाग*

*200 च्या वर कर्करोग,70 नेत्ररोग तपासणी*


*15 यूनिट रक्तदान तर 40 लाभार्थ्यांना चश्मे वाटप*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरःसहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्या 92 व्या जयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्र संत तुकडोजी महाराज कँन्सर हाँस्पिटल नागपूर च्या वतीने स्तन व गर्भाशय,मुख कर्करोग तसेच नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर व चश्मे वाटप असे भव्य शिबीराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा स्व.बाबासाहेब केदार यांचे पुत्र व क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची मुलगी डॉ पोर्णीमा चिंचमालापुरे (केदार) यांच्या वतीने करण्यात आले होते.सदर शिबीरात जवळपास 400 रुग्णांनी सहभाग नोंदवून सदर आयोजन यशस्वी करण्यात सहभाग घेतला.*
*सदर शिबीरात 178 कर्करोग,50 मुख कर्करोग,23 स्तन कँन्सर 11 गर्भाशयाचे कर्करोग रुग्णांची तपासणी करुण त्यातील 13 रुग्णांना पुढील उपचाराकरिता कँन्सर हाँस्पिटल नागपूर येथे रवाना करण्यात आले.तर 70 रुग्णांची नेत्र तपासनी करुण 40 रुग्णांना वेळीच चश्मे वाटप करण्यात आले व 8 रुग्णांना मोतीबिंदू असल्यामुळे पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला.तर या प्रसंगी लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर च्या चमूंनी 15 यूनिट रक्तदान संकलन करण्यात आले*
*सदर शिबीरास राष्ट्र संत तुकडोजी महाराज हाँस्पिटल चे तज्ञ चिकित्सक डॉ बी.के.शर्मा,डॉ. अमोल हेडाऊ,डॉ. स्मृती मानकर,डॉ. भुषण देशमुख सह डॉ. वर्षा शंकरवार वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केन्द्र खापा प्रामुख्याने उपस्थित होते*
*याप्रसंगी बोलतांना डॉ बी.के.शर्मा यांनी म्हटले की ग्रामीण भागात कार्य करतांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते.व ग्रामीणांशी संवाद साधून त्यांच्याशी आरोग्य विषयक विशेषतः कर्करोगा विषयी जनजागृती करणे व कर्करोगा विषयी ग्रामस्थांन मधे असलेली भीती,आज्ञानता व गैरसमझ दुर करण्याकरिता असे आयोजन प्रेरक ठरतात व शासनाव्दारे अश्या आयोजनावर विशेष भर दिल्या जात आहे.तर डॉ. अमोल हेडाऊ यांनी कर्करोग कसा होतो,त्याची करणे व लक्षणे काय व याची दक्षता कशी घ्यावी यावर सविस्तर माहिती दीली*
*सदर शिबीराच्या मुख्य आयोजका डॉ. पोर्णीमा यांनी आपल्या संबोधनातुन म्हटले की मी आजवर 60 च्या वर अश्या रोग नीदान शिबीराचे सफल आयोजन केले आहे परंतू आजचे हे शिबीर माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण शिबीर आहे कारण आज माझे आजोबा सहकारमहर्षी बाबासाहेब केदार याचा जन्मदिवस माझे वडील क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांच्या कार्यक्षेत्रात हे शिबीर होत असल्याने मझ्याकरिता हे शिबीर विशेष आहे असे मला वाटते.ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळाव्या व त्यांना योग्य आरोग्य विषयक सल्ला मीळावा,त्यांची तज्ञ चिकित्सकांकडून योग्य तपासणी व्हावी,उपचार सेवा मीळावी व जिवधेण्या आजारां विषयी त्यांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे याच प्रामाणिक हेतूने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत म्हटले की अश्या आयोजनांची ग्रामीण भागात नितांत आवश्यकता असुन असे सामाजिक कार्य केल्याने जो आनंद प्राप्त होतो त्याची कींम्मत कधीही लेखल्या जाऊ शकत नाही व अश्या सामाजिक कार्याकरिता माझ्या सारख्या उच्चशिक्षीत युवक युवतींने पुढे यावे असे आव्हान याप्रसंगी केले.*
*सदर शिबीराच्या यशस्विते करीता माजी नगराध्यक्ष कैलास कापसे,महेश वैद्य, जीतेन्द्र आवते,हेमराज बारापात्रे,विलास आवते,मिलिंद बुरडे,छोटू हरडे,मोहसिन पठाण, संतोष लांजेवार,शुभम शेंडे,गौरव कोल्हे यांनी परिश्रम घेतले तर प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा येथील डॉ. मोहित थुल,डॉ. प्रशांत तेलसे,आरोग्य कर्मचारी व्ही.एल.गायकवाड,ए.एस.पाँल,जी.एम.मेश्राम,आर.एन.महाजन,ए.एस.बुरम,डि.एस.सुर्यवंशी,श्रीमती एस.सातपुते,एस.कुंभारे,आर.बी.शेख,वनिता घोटेकर,अर्चना दिवटे,एस.परमोटो,श्री.सी.के.बंन्सोड आदीनी सहकार्य केले.*
*सदर शिबीराचे सुत्र संचालन जी.एम.मेश्राम यांनी तर प्रस्तावित डॉ. पोर्णीमा केदार (चिंचमलापुरे)यांनी व आभार डॉ. मोहित थुल यांनी मानले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …