*कन्हान परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस साजरा*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजलि*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य विविध संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून दोन मिनिट मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .

*नगर परिषद कन्हान पिपरी*
कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नगर परिषद च्या नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नगर परिषद च्या अधिकार्यांनी , नगरसेवक नगरसेविकांनी , व कर्मचार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी हर्षल जगताप , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक राजेश यादव , फिरोज बिसेन , संकेत तलेवार , प्रिया शिरसाठ , निरंजन बढेल , देवीलाल ठाकुर , शुभम येलमुले , रविंन्द्र पाहुणे , शुभम कळबांडे , भीमराव मेश्राम , सह आदि नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .



*सत्य शोधक संघ , कन्हान*
सत्य शोधक संघ द्वारे सोमवार दिनांक.६ डिसेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सत्य शोधक संघ कन्हान व्दारे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम, डॉ पंदेराशि परिषद राज्य उपाध्यक्ष शाताराम जळते, ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार माल्यार्पण करून बुध्द वदना घेऊन सामुहीक दोन मिनीट मौनधारण करित भावपुर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी महिलांनी भिम गीत प्रस्तुत करून डॉ बाबासाहेबा च्या कार्यास गौरविण्यात आले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक सतिश भसाळकर यांनी तर सुत्र संचालन जेष्ट विनायकजी वाघधरे हयानी केले. तसेच सत्य शोधक संघा व्दारे सायंकाळी ६ वाजता डॉ आंबेडकर चौकात दोनशे मेणबत्ती शिस्तबध्य लावुन परिसर सुशोभित प्रकाशमय करण्यात आला. या कार्यक्रमास प्रामुख्याने भगवान नितनवरे, विनायक वाघधरे , दौलत ढोके, हरिष बेलेकर, कैलास बोरकर, प्रशांत वाघमारे, रंजनिश (बाळा) मेश्राम, अशोक नारनवरे, शैलेश माटे, सतीश भसाळकर, स्वप्निल वाघधरे, योगेंद्र (बाबु) रंगारी, अश्वमेघ पाटील, रिंकेश चौरे, अखिलेश मेश्राम, सिद्धु ढोके, शैलेश दिवे, मनिष भिवगडे, मयूर माटे, निशान मोटघरे, भारत पगारे, दिनेश नारनवरे, अशोक पाटील, नरेश चिमणकर, सुशील कळमकर, राजेंद्र फुलझेले, महेश धोंगडे सह बहु संख्येने बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

*त्रिशरण बुद्ध विहार संताजी नगर , कांन्द्री*
कांन्द्री संताजी नगर त्रिशरण बुद्ध विहारहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी जेष्ठ नागरिक कैलास शेंडे,अशोक वासनिक, सुरेंन्द्र खडसे,इंदिरा शेंडे, रमा वासनिक, शीला गणवीर, सौम्या गजभिये आणि मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.

*सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर*
कन्हान शहर सामाजिक कार्यकर्ता द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार , चंदन मेश्राम , विपिन गोंडाने , दिपक तिवाडे , पंकज गजभिए , सह आदि नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज