*रामकृष्ण मठ नागपुर व्दारे धर्मराज विद्यालयात गरजु विद्यार्थ्यांना कंबल वाटप*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर व्दारे धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान येथे विद्यालयातील गरजु गरीब विद्यार्थांना कंबल वाटप करण्यात आले असुन या कार्यक्रमाचा ४० विद्यार्थ्यानी सेवेचा लाभ घेतला.
शनिवार दिनांक.४ डिसेंबर २०२१ ला धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर व्दारे विद्यालयातील गरीब गरजु विद्यार्थांना कंबल वाटप कार्यक्रमात मुख्याध्यापिका पमीता वासनिक यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी रामकृष्ण मठचे स्वामी महाबलानंदजी, अजयजी भोयर यांच्या हस्ते कंबल वाटप करण्यात आले असुन विद्यालयातील एकुण ४० विद्यार्थ्याना सेवेच्या लाभ घेतला. कार्यक्रमास विद्यार्थ्यासह पालक सुद्धा उपस्थिती होते. याप्रसंगी स्वामी महाबलानंदजी महाराजानी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल सारवे हयांनी केले. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा पमीता वासनिक हयांनी विद्यार्थी व उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र कडवे सर यांनी तर आभार श्री सुनिल लाडेकर सर यांनी व्यकत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक हरीश केवटे, प्रशांत घरत, प्रकाश डुकरे, अनिरुद्ध जोशी, विलास डखोळे, अनिल मंगर, धर्मेंद्र रामटेके, उदय भस्मे, रजुसिँग राठोड, संतोष गोनांडे, विद्या बालमवार, मनिषा डुकरे सह सर्व शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.