*कन्हान व कांद्री ला स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजलि*
*कन्हान शहर विकास मंच व भाजपा कांद्री शहर द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या सह १३ वरिष्ठ अधिकारी हेलिकॉप्ट दुर्घटनेत शहिद झाल्याने संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी व कांद्री येथे भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन , दीप प्रज्वलन करुन ,तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन स्वर्ग श्री बिपीन रावत सह घटनेत निधन झालेल्या १३ वरिष्ठ अधिकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली*
कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत हे हेलिकॉप्टर ने आपल्या पत्नी सोबत वेलिंगटन येथे एका कार्यक्रमात जात होते . या दरम्यान खराब हवामाना मुळे तमिळनाडुतील कुन्नुर मध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले . यात बिपीन रावत हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचारा दरम्यान त्यांचा निधन झाला . बिपीन रावत यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन स्वर्ग श्री बिपीन रावत सह घटनेत शहिद झालेल्या १३ वरिष्ठ अधिकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , सदस्य हर्ष पाटील , महादेव लिल्हारे , प्रकाश कुर्वे , वीर सिंग शाहरुख खान , किरण ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*कांद्री येथे स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजलि*
कांद्री – स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या विमान दुर्घटनेत निधन झाल्याने संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाले असुन यांच्या निधनाप्रित्यर्थ भाजपा कांद्री शहर आणि युवा मोर्चा द्वारे कांन्द्री गांधी चौक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी श्रद्धांजलि कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा वरिष्ठ नेत्यांनी , पदाधिकार्यांनी व नागरिकांनी दुर्घटनेत शहीद झालेल्या जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अपघातात शहीद झालेल्या 13 शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात केली .
या प्रसंगी भाजप जिल्हा मंत्री जयरामजी मेहरकुळे , तालुका उपाध्यक्ष शिवाजी चकोले , भाजपा पारशिवनी तालुका अनु.जाती मोर्चा तालुका अध्यक्ष लीलाधरजी बर्वे , भाजपा पारशिवनी तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेशजी पोटभरे , भाजपा कांन्द्री शहर अध्यक्ष गुरुदेवजी चकोले , राहुल वंजारी , शेखर गिर्हे , संकेत चकोले , भाजपा युवा मोर्चा कांन्द्री शहर अध्यक्ष लोकेश अंबाडकर , महेंद्र पलीये , हेमराजअंबाडकर , फजितराव बावणे , सहादेव चौधरी , मधुकर पोटभरे , प्रशांत देशमुख , पराग पोटभरे , गणेश किरपान , अमोल कापसे , प्रवीण आकरे , सागर पोटभरे , लावण्य पोटभरे , भोला मंडळेकर , आनंद देशमुख , शैलेश हिंगे , नितीन नेरले , अशोक चांभारे , सूरज सरोदे सह आदि भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.