*युवा स्वाभिमान चे दिलीप पोटफोडे यांचा शेकडो कार्यकर्त्यां सह प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश*
आर्वी : युवा स्वाभिमान चे आर्वी विधानसभा प्रमुख दिलीप पोटफोडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुबोध दादा मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नागपूर येथे महिलां व पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यासह प्रवेश केला.
जनता जनार्दना साठी कार्य करणाऱ्या नवतरुनाची चांगली फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण होत असून आर्वी तालुक्यासह विधानसभा क्षेत्राला नवी उभारी मिळेल असा आशावाद ना. जयंत पाटील साहेब यानी व्यक्त केला तत्पूर्वी वर्धा विश्राम गृहात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी केंद्रीय मंत्री सुबोध जी मोहिते पाटील, पक्ष निरीक्षक राजाभाऊ टाकसाडे सुधिर भाऊ कोठारी, मध्यप्रदेश चे प्रभारी माजी खासदार कुकडे, आदीची प्रमुख उपस्थिती होती
दिलीप पोटफोडे यानी मागील 12 वर्षाच्या कालावधीत अनेक आंदोलन करून प्रशासनास वेठीस धरून जनसामान्यांचे कामे मार्गी लावले विविध समस्या आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लावल्या दिलीप पोटफोडे ह्याच काम तडागाडातील लोकांमध्ये असल्याने तसेच त्यांच्या सोबत शेकडो मेहनती महिलां, पुरुष व तरुणांची फळी असल्याने राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार होण्यासाठी मदत होईल अशी तसेच नवे समीकरण जुडून येतील अशी चर्चा आहे, दिलीप पोटफोडे यांचा प्रवेश झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री, सुबोध जी मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यानी अभिनंदन करून कामाला लागण्याचे आदेश दिलेत तसेच आर्वी विधानसभा प्रमुख गोपाल मरस्कोल्हे, तालुका अध्यक्ष शिरीष काळे, शहर अध्यक्ष संजय देशमुख, हर्ष व्यक्त करत अभिनंदन केले, जयंत पाटील यांच्या हस्ते प्रवेश करताना रेखा वानखेडे, अर्चना टिपले, प्रमिला हत्तीमारे, माधुरी सपकाळ, शिला कंगाले, अंकिता बोरकुटे, भारती पोटफोडे, वासुदेव सपकाळ, बादल काळे, कमलेश चिंधेकर,प्रफुल गोमासे, सूरज मेश्राम, सुरेश शेंडे, सिद्धांत कळंबे, राजु बोरकुटे, आदर्श वानखेडे, सुनील घोडांम, अझहर खान, सिद्धू खान, अनिकेत टिपले, राजु राठोड, सुरेंद्र वाटकर, शंकर हत्तीमारे यानी प्रवेश घेतला