वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पतीला वनविभाग कडून 20000/रुपयाची मदत.
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे.
चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी तालुक्यातील भागवनपूर येथील देवकण्या संपत चौधरी ही स्वतःचे शेतात काम करीत असताना .
काल सायंकाळी5 वाजता वाघाने हल्ला करून तिला ठार मारले. पती संपत चौधरी यांनी पत्नी सौ देवकण्या का घरी आली नाही.म्हणून काही लोकांना घेऊन शेतात गेले तेव्हा वाघांचे पंजे व तीला ठार केले त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तिथे रक्त पडून दिसले यावरून गावकऱ्यांनी शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. काल रात्री उशिरापर्यंत वनविभागाला सूचना दिली व वनविभाग यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालुन चौकशी केली असता. सकाळी
शेता जवळ वाघाने खाल्लेल्या अवस्थेत मृत शरीर मिळाले. वनविभागाने प्रेत ताब्यात घेतले आणि नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करून व वनविभागाने त्या कुटूंबाला सानुग्रह आर्थिक मदत म्हणून 20000/रोख रक्कम उप विभागीय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळीं मा वाकडे साहेब, वन परी क्षेत्राधिकारी गायकवाड साहेब,दक्षिण ब्रम्हपुरीचे वनाधिकारी उपस्थित होते. नागभीड तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्याने शेतकरी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पतीला मदत देताना वनविभागाचे अधिकारी मा,वाकडेसाहेब, गायकवाड साहेब, व अन्य
नागरीकांची उपस्थिती या वेळी होती.