*नागपुर विधान परिषद वर भाजप चा झेंडा* *भाजपा कन्हान शहर पदाधिकार्यांनी चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या केला सत्कार*

*नागपुर विधान परिषद वर भाजप चा झेंडा*

*भाजपा कन्हान शहर पदाधिकार्यांनी चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर विधान परिषद निवडणुकी मध्ये भाजप चे उम्मेदवार मा.श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या दणदणीत विजय झाल्याने भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या निवस्थानी जाऊन त्यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .
नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप चे चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी एकतरफा महाविकास आघाडीचा पराभव केला आहे, मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली होती. माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली असुन 559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात चंन्द्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली असुन मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली असुन 5 मते बाद झालेत. तसेच भाजप मधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.


चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या दणदणीत विजय झाल्यनंतर भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी निवास स्थानी जाऊन त्यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे ,जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष स्वाती पाठक , भाजपा नागपुर जिल्हा अनुसूचित जाति मोर्चा महामंत्री रिंकेश चवरे , भाजपा पारशिवनी महिला अध्यक्ष सरिता लसुंते , अनुसूचित जाति मोर्चा तालुका महामंत्री सचिन वासनिक , तालुका प्रसिद्धि प्रमुख शैलेश शेळकी , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , महामंत्री माधव वैद्य , अनुसूचित जाति मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी , उपाध्यक्ष दिपनकर गजभिए , महिला शहर अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , शहर प्रसिद्ध प्रमुख रुषभ बावनकर अमन घोडेस्वार सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …