*बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
15 नोव्हें.- बिरसा मुंडा यांच्या 144 व्या जयंती निमित्त स्थानिक बिरसा मुंडा कोडशी खू ता. कोरपना वणी रोड येथे प्रधान समाज तर्फे भव्य जयंती साजरी करण्यात आली व ग्राम स्वछता युवा मिञानी राबविण्यात आली सोबत ठानेदार कोरपना गुरनुले साहेब यांनी मार्गदर्शन केले बिसरा मुंडा जयंतीच्या या आयोजनास युवा वर्गाने प्रचंड प्रतिसाद देत जवळपास 100युवकांनी सहकार्य करत गावातील रस्ते साफ सफाई करून आदिवासी जननायक यांची 144 वी जयंती तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून आयोजन अनिल .बोरडे यांनी सुद्धा सहकार्य केले व विशाल गेडाम मारोती जुमनाके गुलाब मेश्राम अनिल मेश्राम रवि मडावी . साई गेडाम संदीप मेश्राम युवा मिञ कोडशी खू आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सदर मेहनत घेतली. कोडशी खू या गावात बिरसा मुंडा जयंती निमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली. शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव व गावकरी या रॅलीत सहभागी होते.