*कन्हान परिसरातील विविध मांगण्याकरिता रस्ता रोको आंदोलन – माजी आमदार श्री डी मल्लीकार्जुन रेड्डी*
*सोमवार ला तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान , कांद्री, टेकाडी , गोंडेगाव, वराडा येथील जनहिताच्या विविध मांगण्याकरिता तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असुन परिसरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे. असे कडकडीचे आवाहन रामटेक क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शनिवार दिनांक.१८ डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ६ वाजता रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी श्री जयराम मेहरकुळे माजी सरपंच यांचे कार्यालय जे एन रोड कांद्री-कन्हान येथे पत्रकार परिषदेत परिसरातील कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव, एंसबा, वराडा येथील जनहिताच्या विविध मांगण्या प्रामुख्याने १) कन्हान कांद्री क्षेत्रात राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांनी नवीन उद्योग सुरू करावे. स्थानिय क्षेत्राचे खासदार, आमदार, नगराध्यक्षा हे एकाच पक्षाचे असुन कन्हान क्षेत्राच्या उद्योगाला गती मिळवुन येथील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. २) मागील आठ वर्षापासुन मंद गतीने कन्हान नदीवर सुरू अस लेल्या मोठा पुल व पोच रस्ता बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावा. ३) नागपुर ते कन्हान कांद्री मेट्रो- २ मंजुर करून लवकरात लवकर काम सुरू करावे.४) कन्हान तारसा रोड वर रेल्वे उडाण पुलाचे काम तातडीने पुर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासा पासुन दिलासा द्यावा. ५) कन्हान नगरपरिषद क्षेत्राचे नवीन विकास प्राधिकरण प्रस्ताव राज्य शासन नगर विकासचे कामे प्रलंबित असुन जनसुविधाचे कामे रखडलेले असुन नवीन उपजिल्हा रुग्णालय, बस स्टँड, पोलीस स्टेशन, खेळाचे मैदान, साप्ताहिक बाजारपेठ व्यवस्था, नवीन बागबगीचे- उद्यान, शाळेची इमारत आदी सोयीसुविधा सध्या होत नसल्याने त्याचा डीपी प्लान मंजुर होणे आवश्यक आहे. ६) कांद्री-टेकाडी वेकोलि कोळसा खदान अंतर्गत सुरू असलेला जेन एन हाॅस्पिटल मध्ये आधु निक आरोग्य सुधार व्यवस्था करून जनतेला आरोग्य सुविधा मिळावी. ७) कन्हान, कांद्री, टेकाडी पंतप्रधान घरकुल योजना प्रलंबित ‘ड’ यादी नागरिकांना पट्टे मिळण्यात यावे. ८) गोंडेगाव पुनवर्सन येथे अत्यावश्य क जनसुविधेचे कामे पुर्ण करण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्त जागा मालकाला त्याचा मोबदला त्वरीत देण्यात याला. ९) वराडा येथे सुरू असलेल्या कोल वाशरीचा वायु प्रदुषणामुळे नागरिकांना हानी होत असल्याने तो तेथुन हलविण्यात यावा. अश्या जनहिता च्या विविध मांगण्याकरिता सोमवार दिनांक.२० डिसेंबर ला सकाळी ११:०० वाजता तारसा रोड टी पाॅईंट चौक कन्हान येथे भाजपा द्वारे रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. श्री डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतुत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. करिता या आंदोलनास परिसरातील नगरसेवक, सरपंच, सदस्य, शेतकरी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. डी मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , जिल्हा परिषद गोंडेगाव-साटक सदस्य व्यंकटजी कारेमोरे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , अनुसूचित जाति मोर्चा तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे , तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा कोषाध्यक्ष धर्मेंद्र गणवीर , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , नगरसेवक राजेंद्र शेंदरे, माजी सरपंच जयराम मेहरकुळे, शहर महामंत्री सुनिल लाडेकर, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, नगरसेविका संगिता खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर , शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , अनुसूचित जाति मोर्चा शहर अध्यक्ष संजय रंगारी , महामंत्री अजय लोंढे , शहर युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत सोलंकी , माजी शहर अध्यक्ष विनोद किरपान , सचिन वासनिक , अमन घोडेस्वार , नरेश पोटभरे , उमेश कुंभलकर , सह आदि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.