*तायवाडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठांतर्गत येणा-या तायवाडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १८ डिसेंबर २०२१ पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे .
महादुला -कोराडीतील तायवाडे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करुन आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले . सातवा वेतन आयोग लागू करणे , आश्वासित प्रगती योजना सुधारित पद्धतीने लागू करणे , ५८ महिन्याची थकबाकी देणे , पाच दिवसांचा आठवडा लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंदआंदोलन सुरु केले . या आंदोलनात श्री .रमेश गायकवाड , अजय वागदे , विनोद ठाकरे , पद्माकर कडवे , मनोज कोल्हे , नीलेश ठेकेदार , शांताराम इझाटे , गुणवंत चौधरी , विनोद तायवाडे , राजू वालुद्रे ,सुनिल वानखेडे ,सुरेद्र ताडघरे इत्यादी कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहे.