ध्येयवादी माणसे यशाची शिखर गाठतात.
अॅड.वामनराव चटप यांचे प्रतिपादन.
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
मनुष्याच्या जीवनाला एक वेगळा अर्थ आहे.हे जीवन सार्थ करण्यासाठी माणसाने निश्चित ध्येय ठेवावे.ध्येयसिद्धीच्या वाटेत येणाऱ्या खाचखडग्यांचा सामना करणारी ध्येयवादी माणसे यशाची शिखर गाठतात असे प्रतिपादन माजी आमदार अॅड.वामनराव चटप यांनी केले.ते पांढरपौणी येथे शेतकरी संघटना युवा आघाडी तर्फे आयोजित ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा’ कार्यक्रमात बोलत होते.तरुण मित्रांनी रम,रमा आणि रमी या व्यसनांपासून दूर राहावे.आपल्या शिक्षणाचा फायदा आत्मउन्नतीसोबत समाजाच्या प्रगतीसाठी करावा.स्पर्धा करण्याची वृत्ती,आत्मविश्वास आणि शुद्ध चारित्र्य जपल्यास यशप्राप्ती होते असेही अॅड.चटप म्हणाले.
गावातील मुले उच्च शिक्षण प्राप्त करून डॉक्टर,वकील,प्राध्यापक,पत्रकार, अभियंते होत आहे.ही बाब अतिशय अभिमानाची असून अशा प्रकारचे सत्कार सोहळे गावोगावी आयोजित व्हावे असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकुरवार यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर दिवे,इंजीनिअर पंढरी बोंडे,नगरसेवक मधु चिंचोलकर,नगरसेवक दिलीप देरकर, नरेंद्र काकडे,प्रभाकर ढवस,कपिल इद्दे, केतन जूनघरे,राजकुमार डाखरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.गावातील उच्चशिक्षित ३० तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संचालन अॅड.दीपक चटप, प्रास्ताविक नरेंद्र मोहारे,पालक मनोगत रमेश रासेकर,आभार नरेंद्र काकडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण चन्ने,परमेश्वर वैरागडे,संतोष मोरे, विजय आत्राम,मनोज निब्रड,अजय मोरे आदी शेतकरी संघटना युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.