*कामगारांच्या ऑटोला कारची धडक 1 मृत; 13 जख्मी*
*सावनेर जवळील खुरजगांव फाटयावरील घटना*
सावनेर प्रतिनिधि -सुरज सेलकर
*सावनेर ता. 17: ड्यूटी आटपून आपल्या घराकडे परतत असतांना मागून येणा-या भरधाव कारने निश्काळजी पणाने कामगारांच्या अॅटोला धडक दिल्याने एक कामगाराचा जागीच मृत्यू तर 13 कामगार जख्मी झाले. अनिल दशरथ बनकर(35)रा.चिचपूरा सावनेर असे मृतकाचे नांव आहे.*
*मिळालेल्या माहिती नुसार सावनेर लगत असलेल्या जीटीएन कंपनीत काम करणारे कामगार अनेक वर्शापासून एका अॅटोद्वारे सावनेर वरून रोज ये-जा करायचे. दि. 17 रोजी रात्री 11-30 च्या सुमारास सावनेर रहीवासी सर्व कामगार आपली ड्यूटी आटपून अॅटो क्र.एम.एच.40 पी 2493 ने सावनेर ला आपल्या घरी परत येत असतांना खुरजगांव फाटया जवळ मागून येणार्या मध्यप्रदेश च्या कार क्र. एम.पी.28 सी.ए. 9590 च्या चालकाने भरधाव वेगाने व निश्काळजी पणाने अॅटोला मागून धडक दिल्याने त्यातील कामगार अनिल दशरथ बनकर (35) याचा जागीच मृत्यू तर अॅटो चालकासह शेषराव भगवान धांडोळे,गिरीश हैरंग,पुरूशोत्तम घोळसे,दिलीप टूले,किरण मंगरूळे,प्रमोद भगवत,खुषाल भुडके,निखील सातपुते,रविन्द्र सेंबेकार,गणेष घोळसे,मुन्ना क्षीरसागर,बळीराम थोटे,किषोर येरपुडे, इतयादी जख्मी आहेत. त्यांना रात्रीला पुढील उपचारा करीता नागपुर मेओ रूग्णालयात दाखल करण्यात आले सर्व जख्मी धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.कार चालकाने आपली कार तिथेच सोडून पळ काढला.*
*केळवद पोलीसांनी घटनेची नोंद घेउन कार चालका विरूद्ध कलम 279,337,304 A,मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा नोंदविला असून पो.अ.सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात अर्जुन राठोड हे करीत आहे.*
*जीटीएन कंपनीचे कामगार आपल्या कर्तव्यावरुण परत येत असतांना घडलेल्या या दुर्दैवी अपधातामुळे आपला एक साथी कामगार हीरवाला तसे अन्य जखमी झाल्याची हळहळ व्यक्त केल्या जात आहे.*