*वेध वन भोजनाच्या आयोजन*
*शेतातील वाग्यांचे भरीत,हिरव्या मिरच्यांचा ठेचा,पालकची डाळभाजी,गाजर,टमाटर,मुळा,पालकांद्याची सलाद व सोबतीला राणं गोवर्यावर केलेले पाणगे सोबतीला जवारीच्या भाकरीची गोडीच न्यारी याउपर यामेजवानीला शेतातील बागबगीचे व मळ्याची साथ म्हणजे अस्सल गावरान मेवा…*
सावनेर – अश्या मैफीलीच्या आयोजनाकरिता खरी वेळ म्हणजे हिच वर्षाचा शेवट व नववर्षाची चाहुल आणी यावेळेला शेतीतील कामातही थोडी शिथलता असल्याने शेतकरी बांधवही आगंतुकांच्या स्वागतार्ह सज्ज असतात.तर शहरी मंडळी ही अश्याच आमंत्रणाची आतुरतेने वाट बघत असतात.*
*ग्रामीण भागात विषेशतः रविवारी व सुटिच्या दिवशी प्रत्येक खेड्यागावात अश्या मैफीलीचे आयोजन बघावयास मीळतात.व शहरी भागातील मंडळी अश्या आयोजनात जातीने सहभागी होऊन शेतातील तुरी,वटानाच्या शेंगा,संत्र मोसंबी,पेरु टमाटर आपल्या स्वहस्ते तोडून आस्वाद तर घेतातच सोबत पीशव्या भरुणही नेतात. धकाधकीच्या जिवनात निवांतपणे निसर्गरम्य वातावरणात खुद् बळीराज्याच्या परिवाराच्या आपुलकीच्या भावाने भरावून जातात…*
*असेच वनभोजनाचे आयोजन नरसाळा खापा येथील शेतकरी संजय जवाहर,धनराज गायधने आदिंनी केले असुन अनेक शहरी व गावकरी आप्तपरिवायाने या वनभोजनाचा आस्वाद घेतला…*