*भिख मागुन पोट भरणाऱ्या लोकांचे कोरोना चाचणी करुन लसीकरण करण्याची मागणी*
*युवा सेने च्या पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यात अनेक लोक भीख मांगुन पोट भरत असतात परंतु त्यांचाकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने आता पर्यंत लसीकरण न केल्याने युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन या विषयावर गंभीर्याने चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन भिख मागुन पोट भरणाऱ्या लोकांचे कोरोना चाचणी करुन लसीकरण करण्याची मागणी केली आहे .
निवेदनात सांगितले कि पारशिवनी तालुक्यात व शहरात अनेक लोक भीख मागुन पोट भरीत असुन त्यांचाकडे त्यांचे कोणतेही ओळखपत्र , आधार कार्ड , मोबाइल नसुन ते कोरोना चाचणी व लसीकरणास उदासीन आहेत . त्यांची कोरोना चाचणी व लसीकरण होत नसल्याने ते सर्व लोक भविष्यातील सुपरस्प्रेडर होऊ शकतात कारण ते आपले भोट भरण्याचा उद्देशाने इतर लोकांच्या घरोघरी जाऊन व बाजारात फिरवुन संर्पकात येत असतात . त्यामुळे पारशीवनी तालुक्यातील व शहरातील सर्व भीक मागुन पोट भरणाऱ्या लोकांचे ते आहेत त्या ठिकाणी जाऊन व शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करुन लसीकरण करण्याची मागणी युवा सेने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देऊन केली आहे .
या प्रसंगी रामटेक विधानसभा सरचिटणीस लोकेश बावनकर , पारशिवनी शहर प्रमुख रोशन पिमला मुंडे , कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , गौरव पनवेलकर , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .