*कन्हान – तारसा महामार्गा वरील खंडाळा गावा जवळ भीषण अपघात* *एका युवकाचा घटनास्थळी मृत्यु , तर दोन गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान – तारसा महामार्गा वरील खंडाळा गावा जवळ भीषण अपघात*

*एका युवकाचा घटनास्थळी मृत्यु , तर दोन गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान – तारसा महामार्गा वरील खंडाळा (निलज) गावाजवळ रस्त्यावक नादुरूस्त उभ्या ट्रक ला मागुन दुचाकी ची धडक लागुन झालेल्या अपघातात इरफान खान या युवकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोघे गंभीर जख्मी झाल्याने त्यांचा कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.


सोमवार दिनांक.२७ डिसेंबर ला रात्री ८.३० ते ९:३० वाजता च्या दरम्यान कन्हान ते तारसा महामार्गा वरील खंडाळा गावाजवळ एका दिवसा पासुन नादुरूस्त ट्रक क्रमांक एम एच ३५ -एम- ६५०५ हा कन्हान च्या दिशेने रस्त्यावर उभा असुन रिफ्लेक्टर, इन्डीगेटर लाईट व कुठलिही सुरक्षेची व्यवस्था न केली असल्याने दुचाकी क्रमांक एम एच ४०-ए जी- ९१९७ ने तीन युवक तारसा येथुन कन्हान ला येत असतांना दुचाकी वाहन चालकास अंधारात ट्रक न दिसल्याने ट्रकच्या मागच्या भागाला दुचाकीची धडक लागुन झालेल्या अपघातात दुचाकी चालक इरफान उस्मान खान वय २४ वर्ष राहणार.स्वामी विवेकानंद नगर कन्हान या युवकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर मागे सवार जुम्मन बशिर प़ठाण वय १९ वर्ष राहणार. न्यु मटन मार्केट कन्हान व मोहम्मद फायक महफुज अहमद वय २१ वर्ष राहणार.कामठी हे दोघे ही युवक अपघातात गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ कामठी येथील खाजगी रूग़्णालयात दाखल केले असुन आयसीयुव्ह मध्ये उपचार सुरू आहे. सदर प्रकरणा वरुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी अमजद हसन खान पठाण वय ४३ वर्ष राहणार. न्यु मटन मार्केट कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी ट्रक चालका विरुद्ध कलम ३०४ ए, २८३, ३३०, ३३८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …