*कोळसा खादान नंबर.६ येथे इसमाची गळफास लावुन आत्महत्या*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर.६ येथील जोंगेंदर गोस्वामी हयानी आपल्या राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे
विद्या मयुरा गोस्वामी वय ६२ वर्ष राहणार वार्ड क्रमांक ५ कांद्री हे वेकोलि कोळसा खदानचे सेवानिवृत्त कर्मचारी असुन त्याची पत्नी व १) मनोहर वय ४१ वर्ष, २) जोंगेंदर वय ३८ वर्ष ३) धर्मेंद वय ३५ वर्ष, ४) ऋृषीकेश वय ३२ वर्ष हे चार मुले असुन सर्व विवाहीत असुन माझी पत्नी व मनोहर व ऋृषीकेश माझ्या सोबत वार्ड क्रमांक ५ कांद्री येथे राहतात तर जोंगेंदर व धर्मेंद्र हे दोघे वेगवेगळे कोळसा खदान येथे राहतात. यातील जोंगेंदर यांची पत्नी दिड वर्षा अगोदर मरण पावली. त्याचे दोन मुले हे त्यांच्या पत्नीच्या माहेरी उत्तर प्रदेशात आहे. तो एकटाच खदान नं ६ येथे जुन्या घरी राहत असुन कोळश्या चा ट्रक चालवितो. आणि दारू पिऊन नशापाणी करित असतो. सोमवार दिनांक २७ज्ञडिसेंबर ला दुपारी विद्या गोस्वामी हे आपल्या पत्नी सोबत खदान ला धर्मेद्र चा घरी गेले असता. कुणीतरी फोन करून जोंगेंदर च्या घरी बोलाविल्याने तेथे गेल्यावर लोकांची गर्दी दिसली तेव्हा आत पाहीले तर जोंगेंदर हा घराच्या छताला दुपटा बाधुन गळफास लावुन मृत अवस्थेत आढळला. काही वेळाने पोलीस पोहचुन त्यास लोकांच्या मदतीने खाली उतरवुन शव विच्छेदना करिता कामठी रूग्णालयात पाठविला . अश्या फिर्यादी वडील यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.