*पारशिवनी तालुक्यातील मनसर ते माहुली रस्ता दुरुस्त करण्याची मागणी*
*नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील मनसर ते माहुली रस्त्या वरुन काही दिवसान पासुन खदान चे ट्रक चालत असल्यामुळे रस्ता पुर्णपणे खराब झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका युवा मोर्चा महामंत्री मनोज गिरी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी तहसीलदार यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ मनसर ते माहुली रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे .
मनसर ते माहुली रस्ता वरुन बऱ्याच दिवसान पासुन खदान चे ट्रक चालत असल्यामुळे रस्ता पुर्णपणे खराब झाला असुन मोईल चे ट्रक काळाफाटा रेतीघाट मधुन रेती घेऊन माहुली ते नयाकुंड रस्त्यांनी जात असुन त्या रस्त्याचे काम आताच पुर्ण झाले असुन या रस्त्यावरुन मोईल चे मोठे ट्रक जात आहे . त्यामुळे दोन्ही रस्ते खराब झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे . या रस्त्यावरुन शाळेचे मुल मुली जात असतात व शेतकरी माल घेऊन जात असल्याने हा रस्ता सीएसार फंडा मार्फत पुर्ण करुन द्यावे अश्या मागणी करिता भाजपा पारशिवनी तालुका युवा मोर्चा महामंत्री मनोज गिरी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ मनसर ते माहुली रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .