गडचांदूरात प्रहारचे बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी.

गडचांदूरात प्रहारचे बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी.

(बंगाली कॅम्पवासी ३५ वर्षापासून मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत/जिल्हाधिकाऱ्यांना प्रहारचे निवेदन)

आवारपूर प्रतिनिधि:- गौतम धोटे

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बंगाली कॅम्पवासी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून अक्षरशः नरकयातना भोगत असून पाणी,वीज,रस्ते,नाल्या,अंगणवाडी इमारत इतर मूलभूत सुविधांपासून वंचित असून यासाठी अनेकदा संबंधितांना निवेदने देण्यात आले परंतु स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाच्या दबावतंत्राखाली याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप कॅम्पवासीयांनी केले आहे.स्वतंत्र देशात आदिवासी भागातील सदर नागरिक आजही अंधकारमय जीवन जगत असून याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.डिजिटल इंडियाची बाता मारणार्‍यांच्या डोळ्यात हे चित्र झणझणीत अंजन घालणारे असून आता मात्र संयमाची पराकाष्ठा झाली आहे.तात्काळ बंगाली कॅम्पवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास येत्या काही दिवसात प्रहार जनशक्ती संघटनाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन उभारण्याचा इशारा प्रहार तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत पासून नगरपरिषद, तालुका व जिल्हा प्रशासन ते लोकप्रतिनिधी, मंत्र्यांपर्यंत व्यथा मांडल्या २००८ मध्ये ८ महिने साखळी उपोषण केले.यावेळी सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन केवळ आश्वासने दिले.मात्र अद्यापही सुविधा दिल्या नाही.वस्तीत जवळपास १३५ मुलांची अंगणवाडी अस्तित्वात आहे पण ताटव्याच्या अंधारमय झोपडीत,सर्वांचे शिक्षण धोक्यात आले आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर बंगाली कॅम्पवासीयांनी बहिष्कार टाकला असता कोरपना नायब तहसीलदारांनी भेटे देऊन आश्वासन दिले होते की,याविषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावून प्रश्नांवर मार्ग काढू,मात्र अजूनही काही झाले नाही.निवेदन देण्यासाठी प्रहार चे जिल्हा प्रमुख राहुल पांडव कोरपना तालुका अध्यक्ष सतिश बिडकर,एसीएफचे माजी प्रोग्राम मॅनेजर सोपान नागरगोजे,पंकज माणूसमारे सुरज बार,सत्वशिला घुले,अनील मख,जयदेव मंडल,गणेश बनिक,विश्वनाथ पतंगे, जगन्नाथ महालदार,शोभा मेश्राम,बनमाला बिस्वास,नमीता मंडल,ललिता सोरते इतरांची उपस्थिती होती.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …