कामठीत दुचाकीवरून वाद विवाद -फेरुमल चौकात तणाव चे वातावरण
विशेष प्रतिनिधि
कामठी –ता.१९ नोव्हेंबर: येथील जुने कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फेरुमल चौक गौहर कँटीन समोर एकाची दुचाकी दुसऱ्याच्या दुचाकीला लागल्याने झालेल्या वादात दोन जण जखमी झाले या दरम्यान पोलिसांना जमा झालेल्या लोकांना पंगविण्यासाठी बेत प्रहार करावा लागला.
सविस्तर असे कि रात्री साडे नऊ च्या दरम्यान सिंधी लाईन येथील गौहर कँटीन समोर एक उभ्या असलेल्या दुचाकीला दुसरी जात असलेल्या दुचाकींचा धक्का लागल्याने एकाने फोन करून बोलावल्याने आलेल्या तरुणांनी दुसऱ्या गटातील मोहम्मद फैजान कुरैशी वय ३०, मोहम्मद सागीर कुरैशी वय २५, राहणारे भाजी मंडी कामठी याच्या वर हल्ला करून जखमी करण्यात आले. ताबडतोच पोलिसांनी घटना स्थळ गाठून झालेल्या गर्दी करून बळाचा वापर करून हकाळण्यात आले मात्र काहीच वेळात 20 ते 25 तरुण येऊन वातावरण खराब कफण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी लगेच सौम्य लाठी च वापर करून फेरुमल चौक खाली करण्यात आला या भागातील दुकाने दुकानदारांनी बंद करून निघून गेले पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शाबु उर्फ शहाबुद्दीन पठाण वय ४० , जमालूद्दीन पठाण वय २९ , अजहरुद्दीन पठाण वय २७ ,सर्व राहणार तंबाखू ओली कामठी असे तीन आरोपोला अटक केले असून जुना कामठी पोलिसांनी कलम ३०७ ,३२३, ३४ भदावी प्रमाणाने गुन्हा दाखल केला आहे ,जखमींना येथील उप जिल्हा रुग्णायात प्राथमिक उपचार करून खाजगी दवाखान्यात नेण्यात आले आहे ।