*आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले* *नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्म चाऱ्याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ*

*आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले*

*नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्म चाऱ्याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड लसीकरणात नरखेड तालुक्यातील खंडाळा गावच्या सरपंचाने आरोग्य कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करित भ्रमणध्वनी वरून आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ नागपुर जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपात्काळ सेवा वगळता एक दिवसाचे आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक च्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवस आरोग्य सेवेचे काम बंद ठेवुन घटनेचा निषेध केला.


मंगळवार दिनांक.४ जानेवारी २०२२ ला कोविड लसीकरण काम करित असतांना नरखेड तालुक्यातील खंडाळा (बु) येथे सरपंच श्री मुंदाफळे यांनी आरोग्य सेवक कर्मचाऱ्यास मारहाण व शिवीगाळ करून अप मानास्पद वर्तवणुक करित वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी यंत्रावरून शिवीगाळ केल्याचा निषेधार्थ नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवार दिनांक.५ जानेवारी २०२२ ला आपात्काली न सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक केंद्राच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपात्कालीन सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेधाचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांना देऊन प्रतिलिपी मा. जिल्हा व तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना पाठवुन निषेध नोंदविण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ सरवत हैदरी, डॉ माधुरी चेरेकर, डॉ जयश्री मेश्राम, डॉ नेहा पटेल, डॉ स्वाती गोस्वामी, डॉ पंकज रोजगे, आरोग्य कर्मचारी एस एल पवार, पी एस ढोक, एस डी बाव नकर, सोफिया शेख, कांबळे, अरविंद वनकर, क्रिष्णा मेश्राम, महेंद्र सागोंडे, मनोज खोब्रागडे , सुरेंद्र गिऱ्हे, राहुल जगताप, श्वेता मेश्राम, जया लाटकर, वैष्णवी माकडे, आशिष कोल्हे, आशिष देशमुख, माया शेंडे, श्रवण इंगळे, फरहाण सैय्यद, बागडे, लुटे, जोगकर, जामनिक, भलावी, परते, गाणार सह कन्हान व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करित घटनेचा निषेध केला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …