*युवकांचा मनसे त प्रवेश…*
*जिल्हा संघटक सुनील ठाकरे यांनी पक्षाचे अंगवस्त्र घालुन केले सर्वांचे स्वागत*
विशेष प्रतिनिधि
पारशिवनीःमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष ,मराठी हृदय सम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना चे नागपूर उपजिल्हा संघटक श्री. सुनिल ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पार्शिवानी तालुक्यातील असंख्य नवतरुंनाचा म.न.से.मध्ये जाहीर प्रवेश.
पार्शिवनी तालुक्यातील वाघोडा येथील असंख्य नवतरुंनाच्या जाहीर प्रवेशा दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना यात अमोल गोपाळराव उके,शुभम मोरेश्वर बावणे,सेवक राम तानाजी बावणे,अभिषेक गणेशजी बावणे आदी ना वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती प्रदान करण्यात आली. रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. योगेश परुळेकर साहेब तसेच प्रदेश सरचिटणीस मा. योगेश चिले व प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. महेश जोशी यांच्या सहकार्यानी व मार्गदर्शन असता.शिणगोरी संघटक मंगेश कुंभारे ,विजय केवट, प्रमाणे जाहीर प्रवेश करते वेळी रोशन बावणे,विकास बावणे,रोमी मेश्राम,भूषण बावणे,राकेश बावणे,प्रवीण उके,संदीप बावणे,निखिल बावणे,निखिल उके,शुभम बावणे,रुपेश उके,पवान ठाकरे,सूरज चेपत्कर,शुभाश काम डे इत्यादी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. म.न.से.प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना चे नागपूर उपजिल्हा संघटक श्री.सुनिल ठाकरे यांनी नियुक्ती दरम्यान सर्व म. न.से.पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील पक्ष वाढीस तसेच प्रामाणिक जन कार्य करण्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.