*कन्हान परिसरात १५ ते १८ वयोगटातील पाचव्या दिवसी २२७ विद्यार्थ्याचे लसीकरण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाराष्ट्र शासना च्या आदेशानुसार ३ जानेवारी पासुन १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण सुरू करून पाचव्या दिवसी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे भारतरत्न इंदिरा गांधी विद्यालयात ११७ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ११० विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कन्हान परिसरात एकुण २२७ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असुन आता पर्यंत दोन्ही केंद्रा व्दारे एकुण १७४४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आर्देशान्वये सोमवार दिनांक.३) जानेवारी पासुन १५ ते १८ वयोगटातील मुलाचे लसीकरण शुभारंभ करून शाळा, महाविद्यालयात लसीकरण करण्यात येत असुन पाचव्या दिवसी शनिवार दिनांक.८ जानेवारी ला कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथे ११७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ११० असे परिसरातील एकुण २२७ विद्यार्थ्याचे पाचव्या दिवसी लसीकरण करण्यात आले. आता पर्यंत कन्हान प्राथमिक आरेग्य केंद्रा व्दारे १४९४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे २५० असे दोन्ही केंद्र मिळुन कन्हान परिसरात १५ ते १८ वयोगटाच्या एकुण १७४४ विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात आले आहे.