*रेगुंठासाठी बस सुरु करण्यात यावी. बानय्या जनगाम*
*बससेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने प्रवास
*परिवहन महामंडळाचे दूर्लक्ष*
तालुका प्रतिनिधी सिरोंचा-तिरुपती चिटयाला
महाराष्ट्र राज्य महामंडळ आगार अहेरी आणि आगार गडचिरोली कडून रेगुंठा या परिसरासाठी दोन बस चालवत होते मात्र घेल्या एक वर्षांपासून हि बस सेवा बंद असल्याने रेगुंठा परिसरातील रेगुंठा,परसेवाडा, मोयबीनपेठा, नरसिहापली,कोठापली, दारशेवाडा, बोकठागुडम,झेंडा,चिक्याला,मुलादिम्या, आदी गावातील नागरिकांना बस सेवा बंद असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेगुंठा परिसरातील पंधरा गावातील नागरिकांना तालुका मुख्यालय सिरोंचा आणि जिल्हा मुख्यलाय गडचिरोली येथे रोज ये-जा करावा लागतो. मात्र गेल्या एक वर्षा पासून गडचिरोली व अहेरी आगाराचे बस सेवा बंद झाल्याने या परिसरातील नागरिकांना मुख्यलाय गाठण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. शासनाची बस सेवा बंद असल्याने नाईलाजाने नागरिक खाजगी वाहनाने ये-जा करत आहेत. बस बंद असल्याची फायदा घेत खाजगी वाहन धारकानी सामान्य जनते कडून बस भाड्याचे दुप्पट रक्कम घेत असल्याने यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना आर्थिक नुकसान व मानसिक त्रास होत आहे. खाजगी वाहनांमध्ये सात ते दहा प्रवाशी ने-आणण्यासाठी परमिट असते मात्र संधीचा फायदा घेत एका वाहनांमध्ये पंधरा ते वीस प्रवाश्याना बसवून प्रवास करत असल्याने वाहन केव्हा हि उलटण्याची शक्यता असते.क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवल्याने अपघात होण्याची शक्यता असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.मात्र याकडे खाजगी वाहनधारक दुर्लक्ष करत आहेत.
गडचिरोली-रेगुंठा आणि सिरोंचा-रेगुंठा ही बस सेवा गेल्या एक वर्षांपासून बंद असल्याने तालुका मुख्यालय,बँक,दवाखाना,कृषी कार्यालय,बाजार,कॉलेज,इत्यादी कामासाठी ये-जा करणे कठीण होत आहे *महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवाशाच्या सेवेसाठी* म्हणून घोष वाक्या घेऊन फिरणारी लाल परी गेली कुठे? असे प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर समस्यांकडे मात्र *लोकप्रतिनिधींचा व शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे*
रेगुंठा-गडचिरोली वाया बेज्जूरपली आणि सिरोंचा-रेगुंठा वाया बेज्जूरपली या मार्गाने बस सेवा तत्काळ सुरु करण्यात यावी अन्यथा बेज्जूरपली फाट्या जवळ *आदिवासी विध्यार्थी संघटना शाखा-सिरोंचा* चा वतीने *चाक्का जाम* आंदोलन करण्याचा हिशारा देण्यात आला आहे.