*नागपूर विधानभवन च्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची १२२ वी जयंती थाटात साजरी*
*बेलदार समाज संघर्ष समिती (महा प्रदेश) व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती नागपूर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – संयुक्त महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी खासदार, बहुजन नायक व विदर्भ पुत्र कर्मवीर मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची १२२ वी जयंती सोहळा शासनाच्या कोरोना काळातील सर्व नियमाचे पालन करुन सोमवारी दिनांक १० ला नागपूर विधानभवन च्या प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या १२२ व्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाजी गुंडलवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून , माजी आमदार श्री प्रकाश गजभिये, नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी, डॉ. मनोहर मुद्देशवार ,प्रभाकर मांढरे,अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी श्री अमीत कुमार उपलप, डॉ राहुल कन्नमवार ,पी डब्लू पजारे साहेब , चाफले साहेब हे ,आनंद कसंबे, राजेंद्र बढिये मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन खिंमेश बढिये यांनी प्रस्तावना मुकुंद अडेवार आभार किशोर सायगण यांनी केले.
दादासाहेब कन्नमवार यांचा इतिहास गांव-गावं पोहचावा, त्यांची जयंती नागपूर येथेच नाही तर मुबंई मंत्रालयात सन्मान मिळावा एवढेच नव्हे तर शासकीय, नीमशासकीय , कार्यालयात ही जयंती , पुण्यतिथी साजरी करावी , असे झाले नाही तर बेलदार समाजासह ओबीसी च्या सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे असे माजी आमदार प्रकाश गजभिये म्हणाले .
या जयंती सोहळ्यात कन्नमवार दिनदर्शिका २०२२ चे विमोचन करण्यात आले. कन्नमवार दिनदर्शिका अविरतपणे गेल्या पंधरा वर्षांपासून बेलदार समाज संघर्ष समिती तर्फे प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र बढिये यांच्या सहकार्याने प्रकाशित होत असून या माध्यमातून दादासाहेबांच्या कार्याचा चित्र व माहिती द्वारे प्रचार करण्यात येत आहे.
यावर्षी शोध भाकरीचा या चित्रपटाचे दिग्दर्शक व ज्येष्ठ पत्रकार श्री आनंद कसबे यांचा व पेन्सिल चित्रकार चि. यथार्थ मांचमवार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज संघर्ष समिती (महा प्रदेश) व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती नागपूर तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दादासाहेब कन्नमवार प्रेमी, भटक्या विमुक्त व बहुजन समाजातील नागरिकांनी कोविड १९ नियमांचे पालन करीत बहुसंख्येने उपस्थित राहिले आयोजक समितीतर्फे अध्यक्ष श्री राजेंद्र बढिये, सदस्य , श्री विनोद आकुलवार, , श्री दिनेश गेटमे, श्री संघर्ष वाहिनीचे संघटक श्री दिनानाथ वाघमारे, श्री राजू चव्हाण, अर्चना कोट्टेवार, प्रेमचंद राठोड,राजू फेद्देवार,रतन इंगेवार, राजू जाजूलवार,प्रवीण दिघोरे,शैलेश निरंजने , धीरज भिसीकर, लक्ष्मीकांत माडेवार, उमेश कोराम, चारुदत्त बेझलवार , अरविंद बोमरतवार , धर्मेश जाधव, संतोष कार्लेवार, नरेंद्र तालेवार , शंकर पारपल्ली , बबलू श्रीगिरीवार , सौ.पुष्पां बढिये , सौ.स्वाती अडेवार , सौ.अश्विनी नागुलवार , सौ.प्रिया मांचमवार , आणि अण्णा साहेब गुंडलवार कॉलेज चे शिक्षक , कॉग्रेस बी सी विभाग प्रदेशा उपाध्यक्ष संजय भिलकर,शहर सचिव नागेश राऊत,कृष्णा गावंडे, अजय इंगोले,जगदीश गमे,संजय मांगे,रुपेश कानेकर, खुशाल चौरे मनीश गेटमे ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.