*मकर संक्रांतीच्या पर्वावर ताज आश्रम सावंगी येथील होणारी यात्रा स्थगित*
*शासनाच्या निर्देशाचे पालन*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः तालुक्यातील ताज आश्रम सावंगी येथील ब्रम्हलीन प.पू.भैय्याजी महाराज यांच्या आश्रमात दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर भव्य यात्रेचे आयोजन केल्या जाते.परंतू यावर्षीही तीसर्या चरणाच्या वाढत्या कोरोना संक्रमणाची दखल घेत यावर्षी यात्रेला स्थगिती दिल्याची माहिती हेटी सावंगी चे सरपंच अशोक डवरे व आश्रमाचे व्यवस्थापक श्री.बुधोलीया यांनी दीली.
*दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर ब्रम्हलीन प.पू.भैय्याजी महाराज व्दारे रचित प्रार्थना स्तोत्रावर आधारित प्रवचनाचे आयोजन प्रसिद्ध प्रवचनकार,संत माहत्म्यांच्या पावन उपस्थितीत संपन्न होत असे.तसेच ब्रम्हलीन प.पू.भैय्याजी महाराजांच्या भाविक मंडळी चा मोठा अफाट परिवार असुन विदर्भासह मध्यप्रदेशातील हजारो हजार भाविक मंडळीसह क्षेत्रातील अनेक मान्यवर व गावकरी एकत्र येऊन ब्रम्हलीन प.पू. भैय्याजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
तर संपूर्ण गावाला विद्युत रोशनाई,तोरणपताकांनी सजवलेल्या जाते त्यामुळे ताजआश्रम सावंगीला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.परंतू तिसऱ्या चरणाच्या वाढत्या कोवीड़ 19 च्या नव्या कोरोना व ओमिक्राँन चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर यात्रेला यावर्षी स्थगिती देण्यात येत आहे.
*भाविक मंडळी व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी होऊ घातलेल्या यात्रेला स्थगिती दिल्याचे हेटी सावंगीचे माजी सरपंच संजय गोडबोले,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.