*कोराडी तलावात आढळले युवकाचे शव*
*चार दिवसापासून होता बेपत्ता*
कोराडी प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- कोराडी येथे दिनांक 1 जानेवारी २२ बॉबी सोमकुवर या चार वर्षाच्या मुलाचे मिसिंग झाल्याची नोंद करण्यात आली होती. दिनांक 4 जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान बॉबीचे शव सुरदेवी कॅनमध्ये तरंगताना आढळून आले. या घटनेची शाई अजून पर्यंत मिटली नसताना गुरुवारी 13 जानेवारी २२ पुन्हा एक शव कोराडी तलावात आढळल्याची वार्ता पसरताच एकच खळबळ उडालेली आहे. चार दिवसापासून बेपत्ता असलेला मृत्तक सुरज अनिल बाला वय 32 वर्ष राहणार आदर्शनगर कोराडी येथील रहिवासी असून सोमवार 10 जानेवारीपासून घरून बेपत्ता होता.
तो कुठे दिसत नाही म्हणून परिवारातील सदस्यांनी कोराडी पोलीस स्टेशन गाठून मिसिंग ची तक्रार दाखल केली होती. चार दिवसापासून बेपत्ता असलेला सूरज हा ऑटोमोबाईल च्या दुकानात कामाला होता त्याला मोबाईलच्या छंद असल्यामुळे त्याला पब्जी या गेम चा खूपच छंद होता पोलीस तपास करीत असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजून 5: 15 मिनिटांनी तलावात त्यांचे शव तरंगताना नागरिकांना दिसले त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिस तत्काळ घटना घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेडिकल नागपूरला रवाना केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक शुभांगी वानखडे चमू करीत आहे.