*कदम रुग्णालय परिसरात पुरलेल्या भ्रुण अवशेष आढळले*
*डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही घेतले ताब्यात*
*तपासात 11कवट्या व 54 हाडे मीळाल्याने एकच खळबळ*
*अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरण : महिला डॉक्टराची कारागृहात रवानगी*
वर्धा प्रतिनिधि –
वर्धा – अपल्यवनी मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रुण अवषेशांसह चआढळून आल्या.याप्रकारणी आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू संगीता काळे ही सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.*
*स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३० हजारात गर्भपात केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह 17 वर्षी अल्पवयीन आरोपी सह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती. कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता 11 कवट्या व 54 भ्रुण अवशेष (हाडे) आणि काही गर्भपिशवी आढळून आली. बुधवारी पुन्हा डॉ. कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. रेखा कदम हिची कारागृहात रवानगी केली.*
*डीएनए टेस्टसाठी पाठविले अवशेष*
*कदम रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्यात इतर टाकाऊ साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल.*
*ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु असुन विषेश तपास पथक नेमुन घटनेची सत्यता उघडकीस आणण्यात येणार असुन सदर घटनेनी राज्यभरात खळबळ माजली आहे*