*कन्हान ला ०७ कोरोना संक्रमित रूग्ण*
*तिसऱ्या लाटेची चाहुल ६४ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ७९ रूग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोरोनाची तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ३६ तपासणी कन्हान परिसरात एकुण ०७ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आता पर्यंत ७९ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ६४ रूग्णाना होम क्वोरंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना तिसऱ्या लाटे ची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे बुधवार (दि.१२) जानेवारी च्या आलेल्या तपासणी अहवालात ०७ रूग्ण संक्रमित आढळले. असे ०७ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९ रूग्ण संख्या झाली आहे.
(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिसऱ्या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. गुरूवार (दि.१३) जानेवारी २०२२ पर्यंत ७२ कोरोना रूग्ण संक्रमित झाले. शुक्रवार (दि.१४) जानेवारी ला कन्हान केंद्रातुन ०७ रुग्ण. असे आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत ७०, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे ६ , कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण ७९ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ६४ रूग्ण होम कोरंटाईन करून उपचार करण्यात येत आहे.