सिरोंचा नागरपंचायत हद्दीतील मोरीवरील पडलेल्या खड्डे बुजविण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष

*नागरपंचायत हद्दीतील मोरीवरील पडलेल्या खड्डे बुजविण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष*

*अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता*
*नगरपंचायतीचे दुर्लक्ष*

*सिरोंचा* नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 8 मधील शहरातील रस्त्यावरील लहान पुलावर मोरी पुटून मोठे खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये बस स्थानक जवळील कल्लार मोहल्याकडे जाणारा रस्त्यात आणि प्रभाग क्रमांक 8 मधील पटवारी कालनीमध्ये रस्त्यावरील मोरीवर खड्डा पडल्याने या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करत आपले हात पाय तोडून घ्यावे लागत आहे. याकडे मात्र नगर पंचायतीचे पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे.
बस्थानक जवळील आणि माजी आमदार पी.आर.तलांडी यांच्या घराजवळ पडलेल्या खड्डा बुजविण्याची मागणी गावकरी कडून होत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …