*आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण*
*डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळवीटचे कातडे*
*पोलीस तपासात काळवीटचे कातळे सापडल्याने वाढल्या कदम यांच्या अडचणी*
वर्धा विषेश प्रतिनिधी
आर्वी – येथील गर्भपात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. पोलिसांनी आज डॉ. कदम यांच्या घराच्या घेतलेल्या झडतीमध्ये काळविटाचे कातडे आढळून आले आहे. आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण आले आहे. पोलीस तपासात काळवीटचे कातडे सापडल्याने डॉ. कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आज दुपारी पोलीसानी डॉ.कदम यांच्या घराची झडती घेतलीय. डॉ.कदम यांच्या घरून 10 फाईल, आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. वनविभाग आणि पोलिसांचा पंचनामा सुरू आहे.
*डॉ.कदम यांच्या घरी काळवीटची कातडी मिळाल्याने गर्भपात प्रकरणात पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. काळवीटची कातडी नेमकी कधीची हे अद्याप अस्पष्ट आहे. वनविभागाचे कर्मचारी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत.
*आधीच गर्भपात प्रकरणात चर्चेत असलेल्या डॉ. कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांची कातडी जप्त करून वन गुन्हा नोंदवण्यात आला आहेय…अद्यापर्यंत यात कोणालाही अटक केली नसून वनविभाग तपास करत असल्याचे सांगण्यात आले.काळवीट चे काही वर्षपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे तपासणी करीत नागपूर ला पाठविण्यात येणार आहे.