*कांद्री बस स्टॉप येथुन कोळश्याने भरलेला ट्रक चोरी* *अज्ञात आरोपी ने ट्रक सह एकुण दहा लाख रुपयाचा मुद्देमाल चोरुन आरोपी पसार* *फिर्यादी ट्रक मालक यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कांद्री बस स्टॉप येथुन कोळश्याने भरलेला ट्रक चोरी*

*अज्ञात आरोपी ने ट्रक सह एकुण दहा लाख रुपयाचा मुद्देमाल चोरुन आरोपी पसार*

*फिर्यादी ट्रक मालक यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कांद्री बस स्टॉप येथुन अज्ञात चोरट्यांनी
कोळश्याचा भरलेला ट्रक सह एकुण दहा लाख रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक मालकाच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१५ जानेवारी २०२२ ला रात्री ८ वाजता च्या दरम्यान ट्रक मालक राम प्रसाद नागोजी पारधी वय ५४ वर्ष राहणार. वार्ड क्रमांक.६ शंकर नगर कांद्री कन्हान यांच्या ड्रयव्हर ने कोळश्याने भरलेला ट्रक क्रमांक. एम एच ४० ए के २४१९ शेंद्री व पिवड्या रंगाचा असुन त्याचा चेसिस नंबर mat४६६३७२ a५jc०८३५७ इंजिन नंबर ०१h६२९२२६०१ हा असुन इंदर ओसीएम माईंन्स येथुन कोळसा भरून महाराजा प्रोसेसर इडस्ट्रीयल इस्टेट बुरहानपुर (मध्यप्रदेश) येथे जाण्याकरिता आशापुरा आरा मशिन कांद्री बस स्टॉप जवळ उभा करून ट्रक मालक रामप्रसाद नागोजी पारधी व ट्रक ड्रायव्हर हे ट्रक ला लाॅक करून घरी निघुन गेले. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक.१६ जानेवारी २०२२ ला सकाळी ५:३० वाजता दरम्यान ट्रक चालक हा ट्रक घेवुन जाण्याकरिता ट्रक जवळ गेला असता ट्रक क्रमांक. एम एच ४० एके २४१९ हा दिसला नसल्याने चालका ने ट्रक मालक रामप्रसाद पारधी यास फोन करून सांगितले. तेव्हा ट्रक मालक रामप्रसाद पारधी यांनी तिथे जावुन पाहणी केली असता तिथे कोळश्याने भरलेला ट्रक मिळुन न आल्याने ट्रक मालक राम प्रसाद पारधी यांनी पारशिवनी, खापरखेड़ा , सिंगोरी, मनसर, भानेगाव, कामठी येथे शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादी ट्रक मालक रामप्रसाद नागोजी पारधी यांच्या ट्रक क्रमांक एम एच ४० एके २४१९ किंमत ८५ , ०००० रुपये व कोळसा अंदाजे २५ टन किमत १५ ,०००० रुपये असा एकुण १०, ००००० ( दहा लाख) रुपये चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी ट्रक मालक रामप्रसाद नागोजी पारधी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …