*कांद्री येथे महिलेची अश्लील छेडखानी*
*महिलेची छेडखानी , अश्लील शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी*
*फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कांद्री येथे घरात घुसुन शेजाऱ्याने ३६ वर्षीय महिलेशी छेडखानी करून महिलेस व मुलास मारहाण करून अश्लील शिवीगाळ करित दोघानां ही जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१५ जानेवारी ला रात्री ८.३० वाजता दरम्यान वार्ड क्रमांक ३ कांद्री येथे ३६ वर्षीय महिला आपल्या घरी स्वयंपाक करित असतांना शेजारी राहणारा नातेवाईक चुलत सासऱ्याचा मुलगा अंनता नागोराव साखरे याने घरात घुसुन महिलेशी अश्लील छेडखानी केल्याने महिला ओरडली असता तिचा मुलगा धावुन आला तेव्हा अंनता साखरे याने महिलेस व मुलास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या पतीचे निधन झाले असुन ती हाथमजुरी करून उदरनिर्वाह करित असते. शेजारी राहणारा नातेवाईक अंनता नागोराव साखरे याने घरात घुसुन महिलेशी अश्लील छेडखानी करून मारहाण व अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी अंनता नागोराव साखरे विरूध्द ३५४ ब, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत आहे.