*स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाने कोळश्या सह चोरी गेलेला ट्रक पकडला* *ट्रक व २५ टन कोळसा पकडुन एकुण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करुन एक आरोपी अटक , तर एका आरोपी चा शोध सुरु*

*स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाने कोळश्या सह चोरी गेलेला ट्रक पकडला*

*ट्रक व २५ टन कोळसा पकडुन एकुण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करुन एक आरोपी अटक , तर एका आरोपी चा शोध सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री बस स्टॉप येथुन अज्ञात चोरट्यांनी कोळश्याचा भरलेला ट्रक सह एकुण दहा लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण पथकाने शोध लावुन मनसर समोर ४ किलो मीटर अंतरावरून कोळसा जप्त केला तर रामटेक चारगाव रोड वर रिलायन्स पेट्रोल पंम्प मागुन ट्रक पकडुन कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आला असुन पुढील तपासात कन्हान पोलीसांनी एका आरोपीस अटक केली तर एक आरोपी फरार असुन शोध सुरु आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१५ जानेवारी २०२२ ला रात्री ८ वाजता दरम्यान ट्रक मालक रामप्रसाद नागोजी पारधी वय ५४ वर्ष राहणार. वार्ड क्रमांक.६ शंकर नगर कांद्री कन्हान यांच्या ड्रयव्हर ने कोळश्याने भरलेला ट्रक क्रमांक. एम एच ४० ए के २४१९ शेंद्री व पिवड्या रंगाचा असुन इंदर खुली कोळसा येथुन कोळसा भरून महाराजा प्रोसेसर इडस्ट्रीयल इस्टेट बुरहानपुर (मध्यप्रदेश) येथे जाण्याकरिता आशापुरा आरा मशिन कांद्री बस स्टॉप जवळ उभा करून ट्रक मालक व ट्रक ड्रायव्हर हे ट्रक ला लाॅक करून घरी निघुन गेले. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक.१६ जानेवारी २०२२ ला सकाळी ५:३० वाजता दरम्यान ट्रक चालक हा ट्रक घेवुन जाण्याकरिता ट्रक जवळ गेला असता ट्रक क्रमांक. एम एच ४० एके २४१९ हा दिसला नसल्याने ट्रक मालक रामप्रसाद नागोजी पारधी यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला ८ लाख ५० हजार रूपए चा ट्रक व २५ टन कोळशा १लाख ५० हजार रूपए असा एकुण १० लाख रूपयाच्या मुद्देमाल चोरी केल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने ४८ तासात शोध लावत राष्ट्रीय चारपदरी महामार्ग मनसर समोर ४ किलो मीटर वर कोळसा जप्त केला तर रामटेक चारगाव रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पम्प मागुन ट्रक पकडुन १० लाखा चा मुद्देमाल कन्हान पोलीसां च्या स्वाधिन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनी अनिल राऊत, हेड कॉन्स्टेबल विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, नापोशि शैलेश यादव, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, साहेबराव बिहाडे व सुधिर चव्हाण यांनी शिताफीतीने करित कन्हान पोलीसाच्या ट्रक व कोळसा स्वाधिन केले. यातील आरोपी १) संजु अशोक काथोटे २) लाला यादव हा आरोपी फरार असल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे व कन्हान गुन्हे पथकांचे राहुल रंगारी , सुधिर चव्हाण हयांनी आरोपी १) संजु अशोक काथोटे वय ३५ वर्ष राहणार वेकोलि टेकाडी नविन वसाहत यास अटक करण्यात यश आले तर २) आरोपी लाला यादव फुकट नगर कांद्री हा फरार असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …