*चार राज्यांना जोडणारा इंद्रावती नदीवरील एकमेव पूल* इंद्रावती नदीवरील पुलाचे काम पूर्ण

*चार राज्यांना जोडणारा इंद्रावती नदीवरील एकमेव पूल*
इंद्रावती नदीवरील पुलाचे काम पूर्ण


महाराष्ट्र,तेलंगणा,छत्तीसगढ,आंध्रप्रदेश या राज्यांला जोडले गेले तिन्ही महामार्ग याच पुलावरून

गढ़चिरोली प्रतिनिधी -तिरुपती चिटयाला

गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा आणि दक्षिण टोकावर वसलेले आणि तीन राज्याचा सीमेवर असलेल्या जिल्हयाचा शेवटचा तालुका म्हणून *सिरोंचा* ला ओळखले जातात. सिरोंचा तालुक्याला तिन्ही बाजूने तीन नद्यावे व्यापलेला आहे. प्रामुख्याने प्राणहिता,गोदावरी,इंद्रावती या नद्यांवर अनेक वर्षांपासून पूल नसल्याने या तीनही राज्याचा संप्रक होत नव्हता.आणि पूल नसल्याने महाराष्ट्र,तेलंगणा,छत्तीसगढ या राज्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करत जीव धोक्यात घालून नावेने प्रवास करावा लागत होता.
तेलंगणा, महाराष्ट्र,छत्तीसगढ, आंध्रप्रदेश या चार राज्यांना जोडण्यासाठी इंद्रावती नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाली असून सिरोंचा तालुक्यातील पातागुडाम आणि छत्तीसगढ राज्यातील भोपालट्टाणम जवळील तिमेड या गावाजवळ इंद्रावती नदीवर 22 पिलर असून या पुलाची लांबी 660 मीटर एवळी असून सदर पूल बांधकामासाठी शासनाकडून 140 कोठी खर्च करून हि पुलाचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती आहे.सद्या पुलाच्या दोन्ही बाजूने काम वेगाने चालू असून काही दिवसात हि पूल लोकांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
प्राणहिता,गोदावरी, इंद्रावती या नदीवर पूल बांधकाम केल्याने तेलंगाणा व महाराष्ट्राचे नागरिकांना इंद्रावती नदीवरील पुलावरून सहजपणे छत्तीसगढ राज्यात नागरिक जाऊ शकतात,तसेच छत्तीसगढ वाया आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टाणम या लोहखनिज असलेले मोठे शहराशी जोडण्यात येईल,आणि दळणवळणाची सुविधा वाळल्याने सिरोंचा आणि भोपालट्टाणम या दोन्ही तालुक्याची बाजार पेठ वाढेल आणि आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्रवरम,विशाखापट्टाणमाची अंतर कमी होईल.गोदावरी,प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांवर पूल झाल्याने महाराष्ट्र,छत्तीसगढ व तेलंगणा,आंध्र प्रदेश या चार राज्यातील नागरिकांची या राज्यसोबत रोटी बेटी संबंध आणि बाजार पेठ जवळ असल्याने या तिन्ही पुलामुले नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध झाले असून या राज्यातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …