*ब्रेकिंग न्यूज*
*महादुला शिवार रामटेक येथे एका अज्ञात इसमाचा शव मिळाला , हत्याची आशंका परिसरात खळबळ*
रामटेक पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला
रामटेक पोलीसांन द्वारे पुढील तपास सुरु
विशेष प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
रामटेक – रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्व भागास १४ किलो मीटर अंतरावर असलेल्या मौजा महादुला शिवारातील रामटेक तुमसर रोड लागत नाली मध्ये एका अनोळखी इसमाचा शव आढळुन आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन हत्येचा संदेह व्यक्त केला जात असल्याने रामटेक पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक १८ जानेवारी ला सायंकाळ च्या सुमारास मौजा महादुला शिवारातील रामटेक तुमसर रोड लागत नाली मध्ये एका अनोळखी इसमाचा शव वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष आढळुन आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन हत्येचा संदेह व्यक्त केला जात आहे . सदर घटनेची माहिती रामटेक पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन शव ला शवविच्छेदना करिता रामटेक येथील रुग्णालय पाठविले आहे .
सदर प्रकरणा बाबत रामटेक पोलीसांनी फिर्यादी शिवचंद महादेव मोहने वय ४९ वर्ष राहणार महादुला यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०२ , २०१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास रामटेक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .