रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
रामटेक प्रतिनिधी- प्रेमानंद हटवार
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट आणि दमयंतीताई देशमुख डीएड व बीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीएड व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी कुमारी दुर्गा गडे हिने केले.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमानंद हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बीए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा. दिलीप गिरडे तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डीएड बीएड विभागप्रमुख प्रा. उर्मिला नाईक यांनी इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर डीएड व्दितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रतीक्षा राहाटे हिने कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. प्रशांत सरपाते प्रा. अनिल मिरासे प्रा. नेवारे, वानखेडे मॅडम,शेंद्रे मॅडम, उके मॅडम,ठाकरे मॅडम आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभले .