*डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर, खेल व युवा मंत्रालय भारत सरकार आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी च्या संयुक्त विद्यमाने डुमरी (कला) गावा मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान करून गाव स्वच्छ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ग्राम पंचायत व प्राथमिक शाळा आणि गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवुन श्रमदान करून गाव, परिसर स्वच्छ करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच रामेश्वर राऊत , उपसरपंच बडुजी भारती , समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष निलेश गाढवे, समाजसेवक नितीन बुरडे , राजे ग्रुप कन्हान चे केतन भिवगडे, रोशन सोनटक्के , ऋषिकेश देवढगळे, महेश दिवटे, हेमंत डेगे, आकाश शेलार, सुबोध डोंगरे, अविनाश बेद्रे, बळीराम चौधरी सह आदि ग्रामस्थ प्रामुख्याने उपसथित होते.