*लग्नाचे आमिष दाखवुन केला मुलीवर लैगिक अत्याचार* *वयाने चार वर्ष मोठी असलेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार* *मुलींच्या तक्रारी वरुन आरोपी युवका विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल*

*लग्नाचे आमिष दाखवुन केला मुलीवर लैगिक अत्याचार*

*वयाने चार वर्ष मोठी असलेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार*

*मुलींच्या तक्रारी वरुन आरोपी युवका विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तर भागास सात किलो मीटर अंतरावर असलेल्या नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर वाघोली शिवारातील लाॅज मध्ये आरोपी धनंजय शिवा गुजर जयभिम चौक, कामठी याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन चार वर्षा पासुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.


प्राप्त माहिती नुसार आरोपी धनंजय शिवा गुजर वय २१ वर्ष राहणार. गौतम डेकोरेशन जयभीम चौक कामठी याने २५ वर्षीय युवती सोबत प्रेम संबंध जुळवुन दिनांक १ मार्च २०१८ ते ९ जानेवारी २०२२ चे दुपारी १ वाजे पर्यंत धनंजय गुजर याने लग्नाचे अमिष दाखवुन वेळोवेळी बळजबरीने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली शिवारातील लाॅज मध्ये शारीरिक संबंध केले. युवती ने आरोपी धनंजय गुजर यास दिनांक. १७ जानेवारी २०२२ ला लग्न करणे बाबत म्हटले असता धनंजय गुजर याने युवतीला लग्न करण्यास नकार देत धमकी दिल्याने कन्हान पोलीस सटेशन येथे फिर्यादी युवतीच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी धनंजय शिवा गुजर विरुद्ध अपराध क्रमांक १७/२०२२ कलम ३७६ (२)(एन) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवा न व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे हे करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …