*कन्हान गहुहिवरा रस्त्यावरुन जाणाऱ्या जड वाहतुकी वरुन वातावरण तापले* *नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या वर गुन्हा दाखल*

*कन्हान गहुहिवरा रस्त्यावरुन जाणाऱ्या जड वाहतुकी वरुन वातावरण तापले*

*नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या वर गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान गहुहिवरा चौक वरुन कांद्री गावाकडे जाणाऱ्या पी डब्लु डी चा रस्ता कन्हान नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी जेसीबी च्या मदतीने बंद करण्यात आल्याने कांद्री ग्रामपंचायत चे उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार टाकली असता कन्हान पोलीसांनी तक्रारदार श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या तक्रारी वरुन नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


गुरूवार दिनांक.२० जानेवारी ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान कांद्री गावाकडे जाणाऱ्या पी डब्लु डी चा रस्ता कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी जेसीबी च्या मदतीने बंद करण्यात आला होता . कन्हान नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसुन सुद्धा जाणुन कांद्री जाणाऱ्या चा रस्यांवर जेसीबी च्या मदतीने गड्ढे खोदुन सिमेंट चे मोठे दगड गाडुन रस्ता बंद केला. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन व सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असुन त्याच रस्त्यावर समोर उडान पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुक खोळबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याने स्थानिय ट्रान्सपोर्टर मालकांनी कांद्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे व काॅंग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांचाशी चर्चा करून निवेदन देत नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती .
सदर प्रकरणा वरुन कन्हान पोलीसांनी तक्रारदार श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या तक्रारी वरुन नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या विरुद्ध कलम ३४१ , ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …