*वाघाने हल्ला करून केले 2 व्यक्तींना गंभीर दुखापत*
*नागपूर -जबलपूर महामार्गावरील चोरबाहुली येथील घटना*
रामटेक प्रतिनिधी – पंकज चौधरी
नागपूर-जबलपूर महामार्गावरील चोरबाहुली जंगल परिसरात वाघाने 2 व्यक्तींवर हल्ला केल्याचे प्रकार नुकताच समोर आला आहे.प्राप्त माहितीनुसार श्री.विमल दीनदयाल तिवारी वय -63 रा.नरसिंगपूर (म.प्र) हे आपल्या परिवारासह स्वतःच्या इलाजासाठी नागपूर येथे जात होते.वाटेतच त्यांच्या पत्नीला लघुशंका आल्याने त्यांनी गाडी क्रमांक.MP 49 C 5287 चोरबाहुली जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला थांबविली.विमल यांच्या पत्नीला पायाचा त्रास असल्यामुळे त्यांना ते आधार देत असताना अचानक जंगलामधून एक वाघ त्यांच्या दिशेने धावत आला.व विमल यांच्या पत्नीच्या हाताला चावा घेतला.अशातच विमल यांनी पत्नीला बचावण्याचा प्रयत्न केले असता त्यांच्या पायाला वाघाने पंजा मारून त्यांना गंभीर दुखापत केले.
सोबत असलेले विमल यांचे मुलगा जितेंद्र विमल तिवारी वय 32 वर्ष यांना एका काठीच्या साहाय्याने त्या वाघाला पळवून लावण्यात यश आले.सदर घटनेची माहिती खुमारी टोल प्लाझा यांना देण्यात आली.त्यांनी तात्काळ पीडितांना आरोग्य उपकेंद्र मनसर येथे आणले.व त्यांच्यावर उपचार सुरू झाले.घायल झालेल्या दोन्ही व्यक्तींना त्यांची स्थिती पाहता त्यांना मेडिकल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.सदर घटनेचा तपशील मनसर व चोरबाहुली वन विभाग करीत आहे..