*७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण*
*स्वातंत्रता संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊण सन्मान*
सावनेर प्रतिनिधी – शुभम ढवळे
सावनेरः 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे सकाळ पासूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांची चिवचिवकट व प्रभात फेरीचा उत्साह कोरोना संक्रमणामुळे दिसून आली नसुन मधुर देशभक्ती गीतांचा कर्णप्रीय आवाज प्रत्येक शासकीय निम शासकीय कर्मचारी व नेते मंडळाची ध्वजारोहणाची लगबग तर हातात झंडे घेऊण मोटरसाईकल रस्त्यावर ओसांडून पडणारी तरुणाईं व देशप्रेम हे या दिनाचे विशेष वैशिष्ट्य असते त्यावर ही कोरोनाचे सावट दिसून आले.
*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचे हस्ते व स्वातंत्रतेचे प्रतीक माणले जाणारे जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांचे हस्ते सचिव विजय बसवार यांचे उपस्थितीत शेकडो गणमान्यांच्या उपस्थितीत सामुहिक ध्वजारोहण पार पडले*
*सकाळी 9-30 ला नगर परिषद हायस्कूल च्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार प्रताप वाघमारे,पो.नी.मारुती मुळूक,,नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे,पंचायत समिती सावनेर चे विस्तार अधिकारी दिपक गरुड,मुख्याधिकारी हर्षला राणे,नायब तहसीलदार गजानन जवादे,प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर च्या प्रपाठक डॉ.मंजुषा ढोबळे,डॉ.संदीप गुजर,डाँ.शिवम पुण्यानी,अँड्.शैलेश जैन आदींच्या प्रमुख उपस्थितीत नगरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस पथक,होमगार्ड पथक,एनसीसी पथक आदिंनी पथ संचालन करुण राष्टध्वजाला मानवंदना दीली.ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले*
*जयस्तंभ बाजार चौक येथे संपन्न ध्वजावंदनास नगर परिषद हायस्कूल सावनेर,सुभाष प्राथमिक शाळा हिंन्दी ,मराठी, अभ्यंकर प्राथमिक शाळा,पलीया हिंन्दी आदी शाळेचे शिक्षकवुंदा सह नगर सेवक सुनील चाफेकर,शपीक सैय्यद, माजी नगर सेवक तेजसिंग सावजी,माया बुंदाले,शैलेश जैन,गोपाल घटे,प्रा.अश्विन कारोकार,सादिक शेख,दिलिप फाले,श्री खुबाळकर, आदी प्रामुख्याने उपस्थीत होते*
*पाणी पुरवठा विभागाचे ध्वजारोहण नगर पालीकेचे उपाध्यक्ष अँड् अरविंद लोधी यांचे हस्ते नगराध्यक्षा सौ रेखाताई मोवाडे,वरिष्ठ भाजप नेते रामराव मोवाडे,नगरसेवक रविंद्र ठाकूर,इंदिराताई झोडापे,आशिष मानकर,तुषार उमाटे तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका,नगर परिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले*
*शासकीय कार्यक्रमाचे संचालन जयसिंग राठोर यांनी तर अमोल देशपांडे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सुजित आढे,अनिल भोसले सह तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले*