*वेडमपली ग्राम पंचायतसाठी आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल*
जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत
अहेरी :- अहेरी तालुक्यातील ऑक्टोबर 2019 मध्ये मुदत समाप्त आलेली ग्राम पंचायतीचे निवडणुक घेण्यात येत असून दिनांक 08 डिसेम्बर 2019 ला मतदान होणार आहे.
मुदत संपणार्या ग्राम पंचायत वेडमपली व पल्ले असे दोन ग्राम पंचायतची निवडूनक होत आहे.
काल वेडमपली ग्राम पंचायतसाठी सरपंच व सदस्यसाठी नामांकन दाखल करण्यात आली.
आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार *श्री दिपकदादा आत्राम* यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात काल तहसील कार्यालयात निवडूक अधिकारी श्री.सोरते साहेब ,यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,पंचायत समिति सदस्य श्री.भास्कर तलांडे,पेरमिलीचे सरपंच श्री.प्रमोद आत्राम,आविसचे सल्लागार श्री.जयराम आत्राम व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.